देश -विदेशमुख्य बातमीराजकारण

राहुल गांधीमुळे माझं आयुष्य बदललं – कलावती बांदुरकर

यवतमाळ :  अमित शहा यांनी कलावती यांच्याबाबत जे विधान केलं, त्याला प्रत्युत्तर देताना कलावती यांनी मला भाजपमुळे-मोदी सरकारमुळे काहीच मिळालं नाही. राहुल गांधी यांच्यामुळेच माझं आयुष्य बदललं, असं सांगतानाच अमित शाह यांच्या आरोपांमधली हवाच काढून घेतली. अमित शाह यांनी काल लोकसभेत राहुल गांधींवर कलावती यांच्या मुद्यावरून घेरल होत. यावरून कलावती यांनी अमित शाह यांना तोंडघशी पाडले आहे.

मूलतः कलावती या बुंदेलखंडातील नसून त्या यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका या गावाच्या आहेत असा दावा कॉंग्रेसने केला आहे. यावरून अमित शाह आणि भाजप तोंडघशी पाडले आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. बुंदेलखंडातील कलावती यांच्या घरी भेट देऊन त्यांनी संसदेत गरिबीची करुण कहाणी सांगितली. नंतर त्यांना कुठलीही मदत केली नाही, असा आरोप केला. पण, राहुल हे बुंदेलखंडातील कुठल्याही कलावतीला भेटले नाही. यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदुरकर यांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी कलावतींच्या समस्या सोडविल्या, असा दावा काँग्रेसने केला आहे.

Advertisements
Advertisements

राहुल गांधी बुंदेलखंडातील कलावती नावाच्या  एका महिलेच्या घरी गेले. तिच्या वेदनांचे राजकारण केले. मात्र वीज, घर, शौचालय, धान्य आणि आरोग्य या सर्व सुविधा मोदी सरकारने उपलब्ध करून दिल्या, असा दावा अमित शहा यांनी संसदेत बोलताना केला. यवतमाळातील काँग्रेस नेत्यांनी मात्र बुंदेलखंडातील अशा कुठल्याही कलावतीला राहुल यांनी भेट दिली नसल्याचा दावा केला. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदुरकर यांच्या घरी राहुल यांनी भेट दिली होती. यानंतर कलावती या प्रकाशझोतात आल्या. त्यांना भरीव मदत करण्यात आली. घर, वीज, पाणी आणि जगण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध केली. सुलभ शौचालयचे बिंदेश्वर पाठक यांनीही मदत केली होती, असेही स्पष्ट केले आहे.

राहुल गांधी यांच्यामुळे मुळेच मला सन्मानाने जगता आले. त्याच काँग्रेसने मला सगळ्यात सुख सुविधा पुरविल्या आहे. मोदी सरकारने मला काहीही दिलं नाही. संसदेत जे कुणी बोलले ते खोटं बोलले, असं कलावती यांनी सांगितलं.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button