क्राईम

धक्कादायक! जंगलात नेऊन पत्नीची निघृणपणे हत्या, पतीनेही जीवन संपवलं

पुणे : पत्नीचा निघृणपणे खून करत पतीनेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पतीने आपल्या बायकोचा दगडाने ठेचून खून करून स्वतःही आत्महत्या केली आहे. ही घटना काल रात्री खडकवासलाजवळील कुडजे गाव येथे घडली आहे.घरगुती वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी कारवाई करत प्रेत पंचनामासाठी पाठवलं आहे.

सुवर्णा सोमनाथ वाघ (वय ३५ रा. उत्तम नगर पोलीस स्टेशन हद्दीत ) असं या खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तर सोमनाथ वाघ (वय 52 रा. उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत) असं खून करून आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा सोमनाथ वाघ ही सोमनाथ वाघ याची दुसरी पत्नी आहे. दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. काल रात्री वाद टोकाला गेला आणि पती सोमनाथ वाघ यांनी पत्नीला कुडजे गावाच्या जंगलात नेले. यावेळी सुवर्णा बेसावध असाताना पतीने तिच्या डोक्यावर दगडाने वार केले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा हिचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर स्वतःच्या ट्रॅक पॅन्टने झाडाला फाशी लावून घेत आत्महत्या केली. असा घटनाक्रमक घडल्याचा अंदाज आहे. दरम्यान , आई- वडील घरी न परतल्याने मुलगी आणि पुतण्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांची दुचाकी कुडजे येथे आढळून आली. परिसरात शोध घेतला असता त्यांना दोघांचे मृतदेह आढळून आले. याबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तपास करत असून, दोन्ही मृतदेह पंचनामा करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button