महाराष्ट्रराजकारण

त्यालाही लायकी लागते; शिरसाटांच्या ‘त्या’ टीकेला सुषमा अंधारेंचे चोख प्रत्युत्तर

पुणे – शिवसेना पक्षात फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी चुल थाटली होती. शिवाय आता शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात गेले. तर तिकडं ठाकरे गटात अनेकांनी प्रवेश केला आहे. यात सर्वात मोठं नाव ते म्हणजे सुषमा अंधारे आहेत. यावरून शिंदे गटाच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट करत अंधारे यांच्यावर टीका केली. त्याला अंधारे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

सुषमा अंधारे यांनी ट्विट करून म्हटलं की, संजय सिरसाट खोक्यांसाठी काहीही झालं असलं तरी राजकारणात प्रत्येक जण थोड्या बहुत शुचिता पाळून असतो असा माझा ठाम विश्वास आहे. परंतु तुमची आजची भाषा ऐकल्यावर लक्षात आले भाऊ म्हणून घ्यायला सुद्धा एक लायकी लागते..! ..अन मुख्यमंत्र्यांनी तुमची पुरती ओळखलेली आहे, अशा शब्दात अंधारे यांनी शिरसाट यांचा समाचार घेतला.

छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संजय शिरसाठ यांनी खळबजनक दावा केला. ते म्हणाले की, त्या म्हणतात, सत्तारभाऊ माझेच भाऊ, भुमरेभाऊ माझेच भाऊ, काय-काय सुरू आहे. कोण आहेस तू? आमचं आयुष्य गेलं शिवसेनेत, आणि तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात, अस म्हणत, शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांचं नाव न घेता टीका केली.

Advertisements
Advertisements

यावेळी ते म्हणाले, की मला अंबादासने फोन करून सांगितलं की, ती बाई लय डोक्याच्यावर झाली आहे. अर्थात, शिरसाट यांचा रोख सुषमा अंधारे यांच्याकडेच होता.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button