गंगाखेडपरभणीमराठवाड़ामहाराष्ट्रमुख्य बातमीराजकारणव्हायरल बातम्या

चौधरी यांच्या पक्षप्रवेशाने गंगाखेड विधानसभेची समिकरणे बदलली !

ऊमेदवारीसाठी होणार रस्सीखेच

पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांचा सत्कार करताना बाळकाका चौधरी व सुशांत चौधरीगंगाखेड :

गंगाखेड कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळकाका चौधरी यांनी आपले बाजार समिती संचालक पुत्र सुशांत चौधरी यांचेसह आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचेसोबतच माजी सभापती बालासाहेब निरस हे ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तंबूत दाखल झाले आहेत. या पक्ष प्रवेशामुळे गंगाखेड विधानसभा निवडणूकीचे समिकरणच बदलले असून ऊमेदवारीसाठी पक्षांतर्गत जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज परभणी दौऱ्यावर आहेत. पूर्वी पासूनच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असलेले चौधरी आणि निरस यांनी आज पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी चौधरी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत विधानसभेच्या उमेदवारीवर दावा केला आहे. आजपर्यंत माजी आमदार सीताराम घनदाट हेच एकमेव दावेदार असलेल्या राष्ट्रवादीकडे आता ऊमेदवारी साठी सक्षम पर्याय ऊपलब्ध झाले आहेत. लोकसभा निवडणूकीपासून सुरू झालेल्या जातीपातीच्या गणितांचा विचार करता पक्ष ऊमेदवारी देताना वेगळा विचार करतो काय ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Advertisements
Advertisements

अडथळ्यांची शर्यत
आज राष्ट्रवादीत मोठे पक्ष प्रवेश झाले असले तरी सुशांत चौधरी यांच्यासाठी ऊमेदवारी मिळवणे ही अडथळ्यांची शर्यत ठरणार आहे. मागील निवडणूकीत शिवसेनेकडे असलेला मतदार संघ आता राष्ट्रवादीला सोडला जाईल का ? हा कळीचा मुद्दा असणार आहे. लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या खा. संजय जाधव यांचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला असून खा. जाधव यांची या संदर्भातली भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेने आपला दावा सोडल्यास राष्ट्रवादीकडून माजी आमदार घनदाट, सुशांत चौधरी यांच्या नावाचा विचार होईल. जातीच्या गणितांवर घनदाट बाजुला केले जावू शकतात. या परिस्थितीत युवा ऊमेदवार म्हणून सुशांत चौधरी यांच्या नावाचा विचार वरीष्ठपातळीवरून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button