Uncategorized

उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार मंत्र्यांच्या उपस्थितीत राजेश विटेकर यांना दिलंय पुष्पगुच्छ; केला सन्मान आणि सत्कार

परभणी

विशेष

हनुमंत चिटणीस

Advertisements
Advertisements

परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व नेते उपस्थित होते…..

यावेळी माहिती सांगताना राजेश विटेकर म्हणाले की,

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते ना.अजित दादा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यामुळे त्या सदिच्छा आणि ती भेट माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. यंदाच्या या शुभेच्छा आयुष्यभर स्मरणात राहतील.

माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांला जीवापाड जपणे, मनापासून प्रेम करणे, काळजी घेणे हि अजित दादा पवार यांची जमेची बाजू आहे. शुभेच्छांमुळे मी दादांचा मनापासून आभारी आहे.

यावेळी अजित दादा पवार यांच्यासह राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे काका, अमरसिंहजी भैया पंडित, आमदार बाबाजानी दुर्राणी , नगराध्यक्ष वसंतराव सिरस्कर, सभापती दशरथ पाटील सूर्यवंशी, माधवराव भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

 

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button