परभणी : परभणी येथील श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात कार्यरत असणारे प्राचार्य डॉ.विठ्ठलराव घुले यांची निवड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांनी बहिस्थ शिक्षण तज्ञ सल्लागार समितीच्या सदस्यपदी नुकतेच नामनिर्देशन केलेले आहे.
प्राचार्य डॉ.घुले हे यापूर्वी नांदेड विद्यापीठाच्या अनेक समितीवर सदस्य म्हणून तर संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे रिसर्च कमिटीवर तज्ञ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे इतिहास विषयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून प्राचार्य डॉ.घुले यांचे अभिनंदन होत आहे.
Advertisements
Advertisements
Follow Us