देश -विदेशमुख्य बातमी

चंद्रयान-3 चंद्राला सोडून पृथ्वीकडे परतला

इस्त्रोचे मोठे यश

चंद्र मोहिमेच्या दृष्टिकोनातून भारतीय अंतराळ संस्थेला मोठे यश मिळाले आहे. इस्त्रोने पृथ्वीच्या कक्षेत चंद्राभोवती फिरणारे चांद्रयान-3 संदर्भात केलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे. चांद्रयान-3 प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परत आणले आहे. यामुळे इस्त्रोने अंतराळ संशोधनात नवीन इतिहास रचला आहे. प्रोपल्शन मॉड्यूल तीन महिने चंद्रावर राहिला. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी चंद्रावरून पृथ्वीवर त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला. २२ नोव्हेंबर रोजी हे यान पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूतून गेले. यामुळे आता इस्त्रो फक्त चंद्रावर एखादी वस्तू पाठवणार नाही तर त्या ठिकाणावरुन परतही आणणार आहे.

लँडर विक्रमची झेप नंतर…

चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर विक्रमची झेप यापूर्वी यशस्वी ठरली होती. त्यानंतर इस्त्रोचे हे आणखी मोठे यश आहे. इस्त्रोने पाठवलेले प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या 150 किमी कक्षेत फिरत होते. आता पृथ्वीच्या कक्षेत आहे. 14 जुलै 2023 रोजी इस्त्रोने मिशन मून लॉन्च केले होते. चंद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅण्डींग केले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणे हा चांद्रयान-3 मोहिमेचा मुख्य उद्देश होता. हे एक मोठे यश होते आणि लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंगनंतर पृथ्वीवरील 14 दिवस कार्यरत होते. त्याच वेळी, प्रोपल्शन मॉड्यूलचे काम लँडर मॉड्यूलला पृथ्वीपासून चंद्राच्या कक्षेत वेगळे करणे हे होते.

इंधनाची केली बचत

प्रोपल्शन मॉड्यूल केवळ तीन महिने चंद्राच्या कक्षेत राहणार होते. पण, इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कार्यक्षमतेमुळे त्यात 100 किलो इंधन शिल्लक राहिले. इस्रोने प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यासाठी ते इंधन वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे परतीच्या मोहिमेतही महत्त्वपूर्ण माहिती संकलित करता येईल.

Advertisements
Advertisements
उपग्रहाशी टक्कर होण्याचा धोका नाही

इस्रोने म्हटले आहे की प्रोपल्शन मॉड्यूल 13 दिवसांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करत आहे. या मॉड्यूलची कक्षा देखील बदलली गेली आहे. तसेच पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कोणत्याही उपग्रहाला प्रोपल्शन मॉड्यूल आदळण्याचा धोका नसल्याचे इस्त्रोने स्पष्ट केले आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button