गंगाखेडजगात जर्मनीपरभणीमराठवाड़ामुख्य बातमी

‘युवा जल्लोष’ स्पर्धेत गंगाखेडच्या प्रियंका अवचार ने मारली बाजी !

राज्यभरातील स्पर्धकांचा होता सहभाग

परभणीः

प्रियंका अवचार आणि पहिला नंबर हे समिकरण आता चांगलेच रुढ झाले असल्याचे दिसत आहे. प्रियंकाने आजपर्यंत स्थानिक ते राज्य पातळीवरील विविध स्पर्धा गाजवल्या असून बहुतांष ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावला आहे. परभणीत संपन्न झालेल्या राज्यस्तरीय महानृत्य स्पर्धेतही गंगाखेडच्या प्रिभूषन नृत्य अकादमीच्या प्रियंका अवचार ने प्रथम क्रमांक पटकावत पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

कॉंग्रेस अ. जा. विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा बहुजन नेते सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांच्या वाढदवसानिमित्त राज्यस्तरीय महानृत्य म्हणजेच “युवा जल्लोष २०२४” नृत्य स्पर्धा २८ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेला  उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

Advertisements
Advertisements

राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून स्पर्धक आपली कला दाखवण्यासाठी परभणी मध्ये दाखल झाले होते. ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली. शालेय गट, खुला गट व लावणी गट या प्रकारामध्ये स्पर्धा संपन्न झाली. या सर्वच कलाप्रकारांमध्ये महाराष्ट्रातील ७० नामवंत स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील लावणी गटात जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा अतिशय अती तटीची झाली. आणि यंदाच्या चौथ्या वर्षाच्या महानृत्य युवा जल्लोष स्पर्धेचे अंतिम विजेती ठरली गंगाखेडची प्रीभूषण डान्स अकॅडमी ची प्रियंका अवचार. मान्यवरांच्या व परीक्षकांच्या हस्ते तिचा रोख रक्कम, सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. आयोजक डॉ. सुनील तुरुकमाने व सर्वच मान्यवरांनी यांनी तीचे भरभरून कौतुक केले. गंगाखेड परिसरातून प्रियांकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button