मराठवाड़ा

भरधाव ट्रकच्या धडकेत बीड येथील न्यायाधीशासह चालकाचा मृत्यू!

रेणापूर : भरधाव जाणाऱ्या ट्रकने ओमिनीला दिलेल्या धडकेत बीड येथील न्यायाधीश यांच्यासह चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना उदगीर रेणापुर मार्गावर असलेल्या सेवादास तांडा जवळ घडली. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बीड येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेले उद्धव वसंत पाटील रा. अंजनसोंडा खू. तालुका चाकूर जि. लातूर हे ओमिनी क्र. एम एच 17 बी व्ही 12 57 ने रविवारची सुट्टी असल्यामुळे गावाकडे (अंजनसोंडा खु) कडे जात होते. रेणापुर उदगीर मार्गावरून आष्टा मोड कडे जात असताना सेवादार तांडा जवळ भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका मोठा होता की ओमनी कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातात न्या. उद्धव पाटील व चालक बळी नंदकुमार टमके रा. अंजनसोंडा खू. यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. ही दुर्दैवी घटना रात्री दहाच्या सुमारास घडली. धडक झाल्याचा आवाज ऐकून तांड्यावरील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ मदत कार्यास सुरुवात केली मात्र गाडीचा चकनाचूर झाल्यामुळे या दोघांना बाहेर काढण्यासाठी तब्बल दीड तासाचा काळ लागला. या दोघांना रेणापुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले.न्या. उद्धव पाटील हे अनेक वर्षांपासून लातूर येथे वकिली करत होते. त्यांची एक वर्षापूर्वीच न्यायाधीश म्हणून निवड झाली हाेती. सध्या बीड जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button