व्हायरल बातम्या
निराशा आली की अब्दुल कलाम यांचे हे विचार वाचा, मिळेल यश मिळवण्यासाठी जबरदस्त मोटिव्हेशन
‘मिसाईल मॅन’ आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. २७ जुलै २०१५ साली त्याचं निधन झालं होतं. संपूर्ण देशाला आजही भारताच्या ‘मिसाईल मॅन’ची आठवण येत आहे. डॉ. कलाम यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. एक शिक्षक, शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून एपीजे अब्दुल कलाम यांनी आपले संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम आणि लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहेत. हे विचार जर आपण आत्मसात केले तर प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवण्याचा मार्ग आपल्याला मिळेल.
अपयशानं खचू नका!
- १) पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश नशिबाने मिळाले.
- २) जर तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचे असेल तर फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा.
- ३) जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणे थांबवू नका कारण FAIL म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग.
- ४) सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे.
- ५) यशस्वी होण्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही.
- ६) हे शक्य आहे की आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसेल पण आपल्या सर्वाना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी आहे.
- ७) वेगळा विचार करण्याचे धाडस करा, शोध लावण्याचे धाडस करा, अज्ञात मार्गावर चालण्याचे धाडस करा, अशक्य गोष्टी शोधण्याचे धाडस करा आणि समस्यांवर विजय मिळवा आणि यशस्वी व्हा. हे उत्कृष्ट गुण आहेत ज्यासाठी आपण कार्य केले पाहिजे.
- ८) जर एखाद्या देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचा असेल तर मला असे वाटते की आपल्या समाजात असे ३ लोक आहेत जे ते करू शकतात. हे तीनजण म्हणजे वडील, आई आणि शिक्षक आहेत.
- ९) जेव्हा आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला आढळते की आपल्यामध्ये धैर्य आणि लवचिकता आहे, ज्याची आपल्याला स्वतःला जाणीव नव्हती आणि जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हाच ते समोर येते. आपण त्यांना शोधून जीवनात यशस्वी व्हायला हवे.
- १०) जोपर्यंत भारत जगाच्या बरोबरीने उभा राहणार नाही, तोपर्यंत कोणीही आपला आदर करणार नाही. या जगात भीतीला जागा नाही. इथे फक्त शक्ती शक्तीचा आदर करते.
Advertisements
Advertisements
Follow Us