रश्मी खांडेकर प्रभारी सीईओ म्हणून नियुक्त
परभणी,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर यांची परभणी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांनी नियूक्ती केली आहे..
भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नतीने/निवडीने नियुक्त झालेल्या अधिकार्यांकरीता पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसूरी या ठिकाणी 13 फेबु्वारी ते 24 मार्च 2023 या कालावधीत करण्यात आले आहे. त्या प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरीता विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाने परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांना परवानगी बहाल केली आहे. पाठोपाठ शासन स्तरावरुन आपणास त्यासाठी कार्यमुक्त करण्यात येत आहे, असेही पत्राद्वारे कळविले आहे.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार विभागीय महसूल आयुक्तांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती रश्मी खांडेकर यांना सोपविण्याचे आदेश दिले आहेत.