शिक्षण आयुक्त गुरुवार, शुक्रवारी परभणीत, कोणत्याही शाळेला भेट देणार; कर्मचाऱ्यांच्या रजा सुटी कॅन्सल
परभणी
विशेष
राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे दोन दिवसाच्या दौऱ्यावर परभणी जिल्ह्यात येत आहेत या निमित्ताने कोणत्याही शाळेला ते भेट देणार असून सर्व अहवाल अध्यायावत ठेवावेत असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत.
तसेचकोणत्याही कर्मचाऱ्यांची रजा मान्य करू नये असेही या आदेशात म्हटले आहे विशेष म्हणजे उद्या 2 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केलेली आहे मात्र शाळा सुरू राहणार असल्याचे दिसते आहे
…
१/२०२३ शिक्षण विभाग (प्रा.) जिल्हा परिषद परभणी दिनांक :-24/01/२०२३
विषय:- मा. आयुक्त (शिक्षण) म. रा. पुणे यांचा परभणी जिल्हा दौ-याबाबत ( दिं ०२ व ०३ फेब्रु-२०२३)
संदर्भ :- मा. शिक्षण सहसंचालक प्रशासन /अंदाज व नियोजन आयुक्त शिक्षण कार्यालय म. रा. पुणे यांचे परिपत्रक
दिनांक १६/१/२०२३
वरिल विषयास अनुसरुन व संदर्भीय परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे मा. आयुक्त (शिक्षण) म. रा. पुणे हे दिनांक ०२ व ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी परभणी जिल्हयाच्या दौ-यावर येत आसुन आपल्या कार्यालयाची व तालुका अंतर्गत कोणत्याही शाळेस अचानक भेट देवुन तपासणी करणार आहेत. तरी आपण सदर दिनांकास वेळेवर कार्यालयात उपस्थीत राहुन अभिलेख अदयावत ठेवून तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्यात यावीत. या कालावधीत कोणत्याही कर्मचारी यांच्या रजा मान्य करु नये. तसेच या बाबत आपल्या अधिनस्त विस्तार अधिकारी (शि.) / केंद्रप्रमुख/ मुख्याध्यापक / कर्मचारी यांना आपल्यास्तरावरुन सक्त सुचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा.
शिक्षणाधिकारी (प्रा.)