राज्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर आता राज्यभरात सभा घेत आहेत. त्याचवेळी ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ ओबीसीतून मराठा समाजास आरक्षण देण्यास विरोध करत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे केंद्र बुधवारी ६ डिसेंबर रोजी दिल्ली ठरणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुपारी दीड वाजता ही याचिका सुनावणीस येणार आहे. या सुनावणीमध्ये जयश्री पाटील विरोधक आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द केला. यामुळे राज्य सरकारने मराठा समाजास दिलेले आरक्षण टिकले नाही. त्यानंतर राज्य सरकारने 13 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केली होती. राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेनंतर ही पहिलीच सुनावणी सहा डिसेंबर रोजी होत आहे. यामुळे मराठा समाजाचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागले आहे.
Advertisements
Advertisements
Follow Us