गंगाखेडपरभणीमराठवाड़ा

बदलापूर निषेधार्थ गंगाखेड महाविकास आघाडीचा मूक मोर्चा

आरोपींना फाशीची मागणी

गंगाखेड :

न्यायालयाच्या निर्देशांनतर बंद मागे घेत मूक मोर्चा काढून गंगाखेड महाविकास आघाडीने बदलापूर घटनेचा निषेध नोंदवला. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गंगाखेडच्या भगवती चौकातून सकाळी आकरा वाजता मूक मोर्चा काढण्यात आला. कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. काळ्या फिती लावून बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसून मूक आंदोलन करण्यात आले. यानंतर महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

Advertisements
Advertisements

कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऊद्धव सातपुते, जेष्ठ नेते बालासाहेब निरस, सुशांत चौधरी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख विष्णू मुरकुटे, ॲड. मनोज काकाणी, शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब राखे, महिला आघाडी संघटक सखुबाई लटपटे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सिमाताई घनवटे, कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे मराठवाडा उपाध्यक्ष मुश्रफ खान, मंगल बोडखे, सुरेखा ऊदावंत, यांचेसह भाकप चे ओंकार पवार, माजी सरपंच नारायण घनवटे, सिद्धोधन भालेराव, नितीन चौधरी, मुस्तफा मामा, राजू सावंत, प्रमोद मस्के, गोपीनाथ भोसले, अमानुल्ला काका, चंद्रशेखर साळवे, जितेश गोरे, बालासाहेब पारवे, गंगाधर पवार, राणीसावरगाव कॉंग्रेस अध्यक्ष शेख मोईन, विनायक राठोड, नागेश डमरे, गौतम रोहिणकर,  भाऊसाहेब मुंडे, संजय सोनटक्के, जगन्नाथ मुंडे, वामन ढोबळे, महारूद्र सावंत, सुभाष शिंदे, शेख अज्जू, आदित्य देशपांडे, संजयलाला अनावडे, नरहरी भोसले, तुकाराम चव्हाण, संतोष टोले, सखाराम ईरकर, अदनान खान,  जालींदर बाबर, शिवाजी शिंदे, अन्ना शिंदे, साईराज शितोळे, सागर शिंदे आदिंसह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. यादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button