‘सरस्वती’ च्या बालमित्रांची बावीस वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा !
स्नेहमिलनात जुन्या आठवणींना ऊजाळा
गंगाखेड :
कालच्या ओळखी आज विसरण्याचे सध्याचे धावपळीचे युग आहे. या काळात शहरातील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तब्बल बावीस वर्षांनी मैत्रीचे धागे जपत ते अधिक घट्टपणे वीणण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्यांनी मोबाईल मध्ये ग्रुप तयार करून स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. आणि बावीस वर्षानंतर पुन्हा एकदा शाळा भरल्याचा अनुभव अनुभवला.
सकाळी लवकर उठुन शाळेला जाण्याची लगबग प्रत्येकाने अनुभवलेली आहे. शाळेची प्रार्थना एकमेकांच्या काढलेल्या खोड्या, सोबत बसून खाल्लेले डब्बे, या सर्व आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात आजन्म रहातात. आयुष्याच्या वाटेवर पुन्हा भेटी होतातच असे नाही. मात्र भेटी झाल्यानंतर त्या आनंदाला पारावर रहात नाही. असाच आनंद घेण्यासाठी गंगाखेड शहरातील सरस्वती विद्यालयातील सन २००२ च्या दहावी बॅच मधील तत्कालीन विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी आले. व शहरातील द्वारका फंक्शन हॉल येथे २६ मे रोजी स्नेह-मिलन कार्यक्रमाचे आयोजन करून एकमेकांना भेटले. आणि तब्बल २२ वर्षानंतर पुन्हा एकदा शाळा भरल्याचा आनंद सर्वांनी घेतला.
याप्रसंगी तत्कालीन विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला शिक्षकवृंद व तत्कालीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहमिलन यशस्वी करण्यासाठी मुख्य संयोजक संदिप देवळे, विनायक रोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रसाद शेटे, क्षितीज चौधरी, मयुर देशमुख, आनंद गडम, श्रीकांत गडम, श्रद्धा चौधरी, प्रतिभा गिराम, स्वाती कोल्हे, ज्योती कोल्हे, माधवी सुगावकर, शुभांगी चौधरी व ईतर सहकार्यांनी त्यांना मोलाची साथ दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंजली बेलूरकर, नागेश बोरीकर यांनी केले. तर आभार विनायक रोडे यांनी मानले.