जन्मदात्या आई-वडिलांसाठी तसा कोणता खास दिवस नसतो, कारण प्रत्येक दिवस हा त्यांचाच असतो. पण तरीही वर्षातून एक दिवस हा मदर्स डे आणि एक दिवस हा फादर्स डे म्हणून जगभरात साजरा केला जातो. दरम्यान यंदाचा फादर्स डे उद्या म्हणजेच १८ जून रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे यंदाचा फादर्स डे हा तुमच्या वडिलांना काहीतरी खास भेट देण्यासाठी अगदी योग्य वेळ आहे. तुमच्या वडिलांना गॅजेट्स आवडत असतील तर बाजारात अनेक चांगले आणि उपयुक्त गॅजेट्स उपलब्ध आहेत. दरम्यान या फादर्स डे दिवशी वडिलांना काय गिफ्ट द्यायचं? हा विचार तुम्हीही करत असाल तर काही खास ऑप्शन्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Noise ColorFit Pro 3 Fitness Band (किंमत – १,४९९ रुपये)
आजकाल आरोग्याच्या दृष्टीने फिटनेस बँड ही एक खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आरोग्याकडे अधिक लक्ष देणाऱ्या वडिलांसाठी फिटनेस बँड ही एक भारी भेट देता येईल अशी वस्तू आहे. फीटनेस बँडच्या मदतीने हार्ट रेट, स्लीपिंग सायकल आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी ट्रॅक करता येतात. हे बँड वॉटर रेसिंस्टंट असल्याने हे अधिक फायदेशीर आहते.
Nokia C22 (किंमत – ९,४९९ रुपये)
आजकाल स्मार्टफोन ही एक अत्यंत गरजेची वस्तू आहे. त्यात प्रौढ व्यक्तीही फोनचा वापर मनोरंजन म्हणून करतात. त्यामुळे वडिलांसाठी फोन हे गिफ्ट देखील एक चांगला ऑप्शन आहे. नोकियाचा हा फोन 5000mAh बॅटरी, मोठा ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले आणि मोफत वायरलेस इअरबड्ससह भेट देण्यासाठी एक उपयुक्त पर्याय ठरू शकते.
TECNO CAMON 20 PRO (किंमत – २४,९९९ रुपये)
या फोनमध्ये पावरफुल असा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. त्यामुळे वडिल लोक या डिव्हाइससह सहजपणे मल्टीटास्क करू शकतात. यात ६.६७ इंचाचा FHD+ डिस्प्ले असल्याने फिल्म किंवा गेमिंगसाठीही हा बेस्ट आहे.यात 64MP ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप असल्याने कॅमेऱ्याच्या दृष्टीने हा फोन मस्त असून 5000mAh बॅटरी फोनमध्ये असून ही दिवसभर उपयुक्त आहे.
Apple Watch Series 7 (किंमत – ३९,१९४ रुपये)
Apple कंपनीचं कोणतंही प्रोडक्ट हे सर्वांना हवंहवसं असतं. त्यामुळे Apple ची ही स्मार्टवॉचही या फादर्स डे ला वडिलांसाठी एक चांगलं गिफ्ट आहे. हे हेल्थच्या दृष्टीनेही महत्त्वाचं डिव्हाईस असल्याने अनेकदृष्ट्या हे उपयोगी आहे. याच्या मदतीने हार्ट रेटवर लक्ष ठेवता येते. फिटनेस ट्रॅक करता येऊ शकते आणि हे उत्तम कनेक्टिव्हिटी देत असल्याने कुटुंब आणि मित्रांशी जोडून राहण्यासाठी देखील बेस्ट आहे.
Sony X82L TV (किंमत – १,५५,९९०)
इतर गिफ्टच्या तुलनेत हे एक महागडं गिफ्ट असलं तरी पैशाच्या दृष्टीने फारच भारी आहे. जर तुमचे वडिल रिटायर झाले असून घरीच आराम करत असतील तर अशामध्ये त्यांच्यासाठी हा दमदार टीव्ही एक भारी गिफ्ट आहे. कारण क्रिकेटपासून ते टीव्ही मालिका, सिनेमे तुमच्या वडिलांना आवडतात, तर मग त्यांच्यासाठी टीव्ही हा उत्तम पर्याय असू शकतो. 4K अल्ट्रा एचडी डिस्प्लेसह आणि हा टीव्ही उत्कृष्ट आवाजासह येतो.