मुख्य बातमीव्हायरल बातम्या

राम लल्लाच्या दर्शनासाठी मुस्लीम युवतीचा पायी प्रवास

नाशिक:  मुंबईमध्ये राहणारी मुस्लीम युवती शबनम शेख ही मुस्लीम युवती बिनीत पांडे आणि रमणराज शर्मा या आपल्या दोन मित्रांसमवेत मंदिर सोहळ्याचा क्षण अनुभवण्यासाठी अयोध्येला निघाली आहे. प्रवासाच्या पाचव्या दिवशी सोमवारी ती नाशिकमध्ये पोहोचली.

येत्या २२ जानेवारीला आयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातील भाविक यासाठी आयोध्येकडे प्रस्थान करीत आहेत. शबनम दोन मित्रांसह मुंबई येथून पायी अयोध्येला निघाली आहे. त्यांच्या प्रवासाचा सोमवारी पाचवा दिवस होता. नाशिकमधून प्रस्थान करीत ते आता अयोध्येकडे पायी निघाले आहेत. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून, याबाबत एका बाजूने विचार न करता दोन्हीहीबाजूंनी विचार केला जावा, अशी अपेक्षा शबनमने व्यक्त केली. लहानपणापासून रामायण कानावर पडले. त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल मनात आदरभाव व उत्सुकता आहे. प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आणखी जाणून घेताना रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या वारी सुरू असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. या तीनही युवकांनी आपल्यासोबत, ग्रीन इंडिया, क्लीन इंडियाचे बॅनर घेऊन स्वच्छतेचाही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button