व्हायरल बातम्या

भर लग्नात नवरी घोरायला लागली

घरात लग्नसराई असेल तर घरच्या मंडळींना लग्न होईपर्यंत डोळ्याला डोळा लागत नाही. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतोच. घरात प्रचंड धावपळ सुरू असते. पळापळ सुरू असते. बरं घरच्याच मंडळींची नव्हे तर नवरा आणि नवरीचीही तीच अवस्था असते. सतत पाहुण्यांचा राबता असल्याने आणि कोणी ना कोणी कोणत्याही वेळी भेटायला येत असल्याने त्यांच्याही डोळ्याला डोळा लागत नाही. त्यामुळे जो तो मग मिळेल तिथे एक डुलकी घेत असतो. एका लग्नाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नवरी चक्क मंडपातच डाराडूर झोपताना दिसत आहे. एकीकडे भटजीचा मंत्रोच्चार सुरू आणि दुसरीकडे नवरीचं घोरणं सुरू असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

राजस्थानातील एका लग्नाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी हवन जवळ बसलेली दिसत आहे. पूजा सुरू असून लग्नविधी सुरू असल्याचं दिसत आहे. नवरदेव शांतपणे सर्व विधी ऐकत आहे. तर पदर ओढून बसलेली नवरीही विधी ऐकत असल्याच्या अविर्भावात बसलेली दिसत आहे. पण नवरी विधी ऐकत नसून डाराडूर झोपल्याचं लक्षात आल्यानंतर नवरदेव नवरीला खुणावतो. तेव्हा नवरी भांबावल्यासारखी जागी होताना या व्हिडीओत दिसत आहे. मात्र, नवरी झोपल्याचं पाहून नवरदेव संताप करण्याऐवजी मिश्किल हसताना दिसत आहे.

अन् पुन्हा सावरून बसली

नवरी झोपल्याचं लक्षात अल्यावर नवरदेव तिला हाताने खुणावत असल्याचं दिसतं. नवरदेवाने खुणावल्यानंतर नवरी जागी होते. पदर आणि साडी व्यवस्थित करते. त्यानंतर पुन्हा व्यवस्थित बसून विधी ऐकताना दिसत आहे. आपल्या देशात लग्न अत्यंत वाजतगाजत पार पाडलं जातं. पण लग्नाच्या दिवशी नवरी आणि नवरदेव किती तणावात असतात, त्यांची झोप पूर्ण झालेली असते का? त्यांना थकवा असतो का याची कुणाला काहीच पर्वा नसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येत आहेत. कुणीही निगेटीव्ह कमेंट करताना दिसत नाहीये.

Advertisements
Advertisements

लग्नाच्या दिवशी सर्व थकतातच

या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. इंटरनेटवरील हा सर्वात चांगला व्हिडीओ आहे. नवरदेवाची प्रतिक्रिया खूप चांगली आहे, असं एका यूजर्सने म्हटलंय. एक अनोखा आणि मन मोहून टाकणारा क्षण. ती हा क्षण कायम स्मरणात ठेवेल, असं दुसऱ्या यूजर्सने म्हटलं आहे. मला वाटतं मेकअपमुळे नवरी खूप थकलेली दिसतेय, असं एकाने तर नवरी खूपच थकलेली दिसतेय. लग्नाच्या दिवशी नवरा आणि नवरी दोघेही थकून जातात, असं आणखी एकाने म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button