व्हायरल बातम्या

दिवसरात्र दारुच्या नशेत धुंद असायची अभिनेत्री; आता तिच्या सालारने केली 650 कोटींची कमाई

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास  याचा बहुप्रतिक्षित सिनेमा सालार काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेत्री श्रुती हसन मुख्य भूमिकेत आहे. श्रुतीने दाक्षिणात्य सिनेमाबरोबरचं अनेक बॉलिवूड  सिनेमांमध्येही काम केलंय. श्रुती ही दिग्गज अभिनेते कमल हसन आणि सारिका यांची मुलगी असल्याने तिची आणखी ओळख सांगण्याची गरज नाही. मात्र, कमल हसन यांची मुलगी असूनही तिने सिनेक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान तिने एका मुलाखतीमधून एक मोठा खुलासा केलाय.  (Shruti Hassan)

काय म्हणाली श्रुती हसन? 

श्रुती हसन एका मुलाखतीत म्हणाली की, “सध्या मी फार साधेपणाने आयुष्य जगत आहे. मी गेल्या 8 वर्षांपासून दारुला हात लावलेला नाही.” त्यामुळे श्रुतीचे आयुष्य फार चांगले झाले, असा खुलासा तिने केला आहे. पुढे बोलताना श्रुती म्हणाली, “एक वेळ अशी होती जेव्हा माझे आयुष्य वेगळ्याच वळणावर गेले होते. मी दिवसरात्र नशेतचं राहत होते. मला मित्रांसमवेत दारु पिण्याची इच्छा होत होती. मात्र, त्यानंतर मी स्वत:मध्ये अनेक बदल केले. आता मला कशाचाही पश्चाताप होत नाही. हँगओव्हरही नसतो आणि सर्वकाही शांत आणि चांगले राहते. मला वाटते की आयुष्यभर अशाच पद्धतीने राहावे.”

8 वर्षांपासून दारुला हात लावलेला नाही 

मी कधीही ड्रग्सला हात लावलेला नाही. मात्र, एक वेळ अशी होती की, दारु माझ्या आयुष्याचा भाग बनली होती. दिवसरात्र दारुच्या नशेत राहत होते, असेही तिने आवर्जुन सांगितले. पुढे बोलताना श्रुती म्हणाली (Shruti Hassan), “जेव्हा तुम्ही सातत्याने दारु पिणाऱ्या लोकांच्या पार्टीमध्ये जात असतात. तेव्हा त्या व्यसनातून बाहेर पडणे फार कठीण असते.”

Advertisements
Advertisements

दारु पिण्यासाठी बोलावणाऱ्या लोकांपासून दूर झाले 

श्रुती म्हणाली, मी मला दारु पिण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या आणि सातत्याने पार्टी करणाऱ्या लोकांपासून दूर झाले. त्यामुळे तिला दारूच्या व्यसनातून बाहेर पडता आले. सध्या तिचा सालार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात ती प्रभास आमि पृथ्वीराज सुकूमारन सोबत दिसत आहे. सध्या सालार हा सिनेमा तुफान कमाई करत आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button