जिंतूरमुख्य बातमी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दत्ता पवारने संपवले आपले जीवन

हातपायावर संदेश लिहून मराठा तरुणाने शेतात आयुष्य संपवलं

परभणी: जिंतूर तालुक्यातील बोरी पोलिस स्टेशन हद्दीतील रेपा या गावात १५ डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास एका सुशिक्षित मराठा तरुणाने हाता पायावर पेनने लिहून मराठा आरक्षण लागू करावे या मागणीसाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, त्याला बेशुध्द अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात आणले असता तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आत्महत्या केलेला तरुण आरक्षणाचा तिसरा बळी ठरला आहे.

जिंतूर तालुक्यातील बोरी पोलिस स्टेशन हद्दीतील रेपा या गावात १५ डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास गावातील विवाहित तरुण दत्ता शिवाजी पवार (वय ३२ वर्ष रा. रेपा) हा परिसरातील शेतात विषारी औषध खाऊन अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. यावेळी गावकऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

यावेळी मृतकाच्या पायावर (एक असली पाटील मराठा आरक्षण २४ डिसेंबर), तर दोन्ही हातावर ‘मिशन मराठा २०२४ आरक्षण २०२३ काय करता ५० मराठा, असा मजकूर लिहिलेला आढळून आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि मराठा आरक्षण समन्वयक समितीचे बालाजी शिंदे सोसकर माजी सैनिक बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे, अँड माधव दाभाडे, प्रभाकर लिखे, आदींनी धाव घेऊन रुग्णालयात नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी जिंतूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक तिडके, बोरी पोलिस ठाण्याच्या सपोनी श्रीमती सरला गाडेकर, परभणी गोपनीय शाखेचे पोलिस हवालदार जिया खान पठाण यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होत प्राथमिक पंचनामा केला. मृतकाच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई-वडील असा परिवार आहे.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button