महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

पंतप्रधान मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स?

 पंतप्रधान नरेंद्र मोदी  आज (28 फेब्रुवारी) रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यवतमाळमधील भारी गावाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. तब्बल 45 एकरवर उभारण्यात आलेल्या कार्यक्रमस्थळी पंतप्रधान मोदी हे दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे. गेल्या आठवड्याभरापासून या सभेची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, या सभास्थळी लावण्यात आलेल्या असंख्य खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे स्टिकर लावण्यात आले असून यात काँग्रेसला देणगीचे आवाहन करणारी जाहिरात करण्यात आली आहे. त्यामुळे मोदींच्या सभेत राहुल गांधीच्या  स्टिकर लावलेल्या खुर्च्या का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित झाला असून या खुर्च्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यातील भारी शिवार येथे येणार असल्याने मागील अनेक दिवसांपासून पंतप्रधानांच्या सभेसाठी जय्यत तयारी केली जात होती. या मेळाव्याला महिला मोठ्या प्रमाणात येत असल्याने पोलिसांचा मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. महिला बचत गटांचा महामेळावा, असं या सभेचा स्वरूप असून या सभेमध्ये एक लाख पेक्षा जास्त महिला उपस्थित राहतील, असा आयोजकांचा दावा आहे. सभास्थानी मोठ्या संख्येने खुर्च्या लावण्यात आल्या असून काही खुर्च्या अशाही आहेत ज्यांच्या पाठीमागे राहुल गांधी यांचे स्टिकर लावण्यात आलेले आहे. त्यामुळे मोदींच्या सभेत राहुल गांधीच्या स्टिकर लावलेल्या खुर्च्या का?? असा प्रश्न सर्वांना उपस्थित होत आहे. मात्र, मुळात ही चूक खुर्च्या पुरवणाऱ्या कंत्राटदाराची असून याच खुर्च्या काही दिवसांपूर्वी नागपुरात काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आल्या होत्या. तेव्हा प्रत्येक खुर्चीच्या मागे काँग्रेसला देणगी देण्यासंदर्भात माहिती देणारे  स्टिकर लावण्यात आले होते. त्यावर राहुल गांधी यांचा फोटो आणि काँग्रेस पक्षाला देणगी देण्यासंदर्भात आवश्यक तपशीलासह क्यूआर कोड छापण्यात आलेला होता. आज मोदीच्या सभेसाठी आणलेल्या खुर्च्यामध्ये काही खुर्च्या काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आलेल्या असाव्यात आणि त्यामुळेच त्यांच्यावर हे स्टिकर दिसून येत आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button