मुख्य बातमी

अतुल सावे यांच्यावर मारहाणीचा आरोप; भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार

विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना ताजी असतानाच,  छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार आणि मंत्री अतुल सावे यांच्यावर हा मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजप पदाधिकाऱ्याकडूनच हा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबईच्या मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विधीमंडळाच्या लॉबीत मंत्र्यांच्या हाणामारीची घटना ताजी असताना आणखी एका मंत्र्याने मारहाण केल्याची तक्रार मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मंत्री अतुल सावेंनी भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदार आसाराम डोंगर हे मंत्री अतुल सावेंना भेटायल गेले असताना, मंत्र्यांनी ‘तू देवेंद्र फडणवीस व बावणकुळेंच्या संपर्कात राहतोस यावरून मारहाण केल्याचे’ तक्रारीत म्हटले आहे. नुसते मंत्र्यांनीच नाही तर त्यांच्या दोन स्वीय सहाय्यक यांनीही मारहाण केल्याचा आरोप आसाराम डोंगरे यांनी केला आहे. त्यामुळे सावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आसाराम डोंगरे यांनी केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, “मी आसाराम उत्तमराव डोंगरे औरंगाबादमध्ये राहणारा आहे, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून, श्री देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचा अध्यक्ष असून मी दि. 01.03.2024 रोजी कॅबीनेट मंत्री अतुल सावे यांना कामानिमित्त भेटायला गेलो होतो. सावे यांनी मला अगोदर सांगितले होते की, तू इथे कशाला आलास, मी तुझे कुठलेच काम करणार नाही. तू देवेंद्र फडणवीस काय, श्री नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांना सांगितले तरी मी तुझे काम करणार नाही व माझे लेटर फेकून दिले. मी बोलायला लागल्यावर मला दोन चापट मारल्या. त्यांचे पीए प्रविण चव्हाण तसेच दुसरा पीए अशोक शेळके यांनी सुद्धा मला मारहाण केली. तू देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेच्या संपर्कात राहतोस. एवढा मोठा झालास का, तुझी औकात काय रे, भिकार** झ**, अशा अनेक प्रकारे आई माईवर शिवीगाळ केली. मला ऑफिसमधून धक्के मारत हाकलून दिले. सावे यांनी या अगोदर सुद्धा मला चार वेळा शिवीगाळ तसेच अपमानास्पद वागणूक दिलेली आहे.  सावे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, ही नम्र विनंती….”

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button