देश -विदेशमानवतमुख्य बातमी

मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे- बागेश्वर धाम बाबा

छत्रपती संभाजीनगर:  मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळालं पाहिजे. भारत जेव्हा गुलामीत होता तेव्हा भारताला गुलामीतून स्वतंत्र करण्याचे उपकार मराठा समाजानं (Maratha Samaj) केले आहेत, असं वक्तव्य बागेश्वर धाम (Bageshwar Dham) बाबांनी (Dhirendra Krishna Shastri) केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा दरबार भरणार आहे. 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबरला अयोध्यानगरी मैदानावर भव्य कार्यक्रम सुरू आहे. याच कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी बागेश्वर धाम बाबांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना बागेश्वर धाम बाबांनी मराठा आरक्षणावर वक्तव्य केलं आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या दरबाराला अंधश्रद्धा निर्मुलन सिमतीनं विरोध दर्शवला होता.

बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा दरबार सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी बागेश्वर धाम बाबांना मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला. महाराष्ट्रात मोठं आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना खरंच आरक्षण मिळू शकेल? असा प्रश्न बागेश्वर धाम बाबांना विचारण्यात आला होता. याच प्रश्नाचं उत्तर देताना बागेश्वर धाम बाबांनी मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, असं स्पष्ट केलं. तसेच, पुढे बोलताना भारत जेव्हा गुलामीत होता, तेव्हा भारताला गुलामीतून स्वतंत्र करण्याचे उपकार मराठा समाजानं केले आहेत. बागेश्वर पीठ मराठ्यांच्या आरक्षणाला पाठिंबा देत आहे, असंही म्हटलं आहे.

काय म्हणाले बागेश्वर धाम बाबा? 

बागेश्वर धाम बाबा मराठा आंदोलनाबाबत बोलताना म्हणाले की, “मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. भारत जेव्हा गुलामीत होता, तेव्हा आपलं शौर्य, वीरता दाखवून भारताला गुलामीगिरीतून स्वतंत्र करण्याचे उपकार मराठ्यांनी केले आहेत. भारताला स्वातंत्र्य करण्याचं सर्वाधिक श्रेय मराठ्यांनाच जातं. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. बागेश्वर पीठ मराठ्यांच्या आरक्षणाला पाठिंबा देत आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धामचे पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या श्रीराम कथेला आयोध्यानगरी येथील मैदानावर सुरुवात झाली. त्याआधी संभाजीनगरातील क्रांती चौकातून भव्य कलश यात्रा काढण्यात आली. या कलश यात्रेसाठी भाविकांनी क्रांतीचौकात मोठी गर्दी केली होती. जय श्रीराम, जय हनुमान , सियावर रामचंद्र की जय, असा जयघोष क्रांती चौकात घुमत होता.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button