महाराष्ट्र

एकही अपशब्द वापरला असेल तर सिद्ध करा

मुंबई : शिवसेना आमदार संजय शिरसाट  यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्यांनी सुषमा अंधारे  यांच्यावर सडकून टीका केली. “कुणालाही माझा भाऊ म्हणायचं आणि त्याच्याबद्दल जे काही वाईट बोलायचं ते बोलायचं. भाऊ बोललं की माफी आहे. अब्दुल सत्तार असतील किंवा भुमरे असतील, त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या सभा होत्या तर मी सहज विचारलं की काय लफडं आहे? तुम्ही काही घोटाळा वगैरे केला का? अशा अर्थाने तो शब्द वापरला”, असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिलं.

‘…तर, तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन’

“सुषमा अंधारेंचा अपमान केला. याच्यात अपमानाचं कुठे आलं तर कळलं नाही. तुमच्या चॅनलवर सुद्धा माझा व्हिडीओ फिरतोय. तो मी काढलेला नाही तर तुम्ही काढलेला आहे. त्या व्हिडीओत मी एकही अश्लिल शब्द वापरलाय असं सिद्ध करुन दाखवलं तर मी तातडीने संजय शिरसाट म्हणतात मला, मी डबल गेम करणारा माणूस नाही. मी तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन. मला सत्ता महत्त्वाची नाहीय. पण तुम्हाला अधिकार कुणी दिला?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“हिंदू देवता, मराठा समाज, बाळासाहेब ठाकरे, उद्धव साहेब आणि आदित्य ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल काय बोलल्या? तुम्हाला असा अधिकार दिला कुणी? अशावेळी एखाद्याला राग आला आणि एखाद्याने वक्तव्य केलं तर सर्व महिलांचा अपमान झाला असं बोंबलायचं. मी आता क्यांची प्रेस कॉन्फरन्स बघूनच आलोय. एखाद्याचा अपमान झाल्यानंतर संतापाची भावना असते पण त्या हसत होत्या. त्यांच्यासारख्या अभिनेत्री कुणी नाही”, असा टोला त्यांनी लगावला.

Advertisements
Advertisements

“सुषमा अंधारे यांनी एक चांगलं केलं. मला प्रेस कॉन्फरन्समध्ये करोडपती करुन टाकलं. 72 कोटी रुपये माझ्याकडे आले आहेत. आरोप करताना थोडी तरी ठेवा. सकाळपासून अनेक लोकांचे व्हिडीओ माझ्याकडे आले आहेत. कुठे काय बोलल्या. काही आपल्या अंगलट आलं की रडायचं. ही सगळी नाटकं लोकांना कळतात. दरवेळेला आपलं स्टेमेंट बदलणं हा तुमचा व्यवसाय झालेला आहे”, असा घणाघात शिरसाट यांनी केला.

‘खपवून घेणार नाही, आमदारकी गेली उडत’

“माझ्या इथे आजही काही निदर्शने झाली. किती महिल्या होत्या तर दहा महिला होत्या. दोन-चार माणसं होती. राजकारण समोरासमोर झालं पाहिजे. पदराआड गोळ्या झाडताय. पण हे चालणार नाही. मी तरी खपवून घेणार नाही. तुमच्या कर्त्याधर्त्यांनाही सांगून ठेवतो. संजय शिरसाट हा पोटासाठी राजकारण करणारा नाही. तुम्हाला लढायचं असेल तर समोरासमोर लढा. याद राखा माझ्या विरोधात बोलायचा प्रयत्न केला तर त्याला मी त्याच भाषेत उत्तर देईन. मागे हटणार नाही. आमदारकी उडत गेली. माझा जन्म त्यासाठी झालेला नाही”, असं शिरसाट म्हणाले.

‘मग मी समुद्राच्या खोलात जाईन’

“जर या बाईला घेवून पक्ष मोठा होणार असेल तर तर तुम्ही दहीहंडी खेळत बसा. मी कुणाच्या वैयक्तीक गोष्टीत जात नाही. मात्र परळीत कुणाची धिंड काढली होती? मला जास्त बोलायला लावू नका. मग मी समुद्राच्या खोलात जाईन”, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला. “एकदा चौकशी कराच फ्लॅटची, मुंबईतील करोडो फ्लॅटपैकी मी एक फ्लॅट नाही घेवू शकत का? जर त्यात खोटं काही निघाले तर मग तुम्ही आहे आणि मी आहे. मग मी तोंडाने बोलणार नाही. आमच्याबद्दल बोलता तेव्हा आमच्या कुटुंबाला काही वाटत नसेल का? मी कधीही कुणाची माफी मागणार नाही”, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button