देश -विदेशमुख्य बातमी

नव्या संसद भवनाचं लोकार्पण, सेंगोलची लोकसभेत स्थापना

नवी दिल्ली : सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत ९७० कोटी रुपयांचा खर्च करुन नव्या संसद भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचं देशाला लोकार्पण केलं. धार्मिक विधी करत नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. नरेंद्र मोदी यांनी ‘सत्ता हस्तांतरण चं प्रतीक’ सेंगोल म्हणजेच राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला स्थापित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नव्या संसद भवन परिसरात हवन-पूजन करण्यात आलं. सकाळी साडे सात वाजता सुरु झालेल्या सोहळ्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते.पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकच्या शृंगेरी मठाच्या पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रांचा उच्चार केला. यावेळी गणपती होम देखील करण्यात आला.

नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या शैव पुरोहितांच्या हस्त सेंगोलचा स्वीकार केला. मोदींनी साष्टांग दंडवत घातला. त्यानंतर लोकसभा भवनात सेंगोल लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला स्थापित करण्यात आला. या सोहळ्याला राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, विदेश मंत्री एस. जयशंकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित होते.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांचा सन्मान केला. नव्या संसद भवनाच्या बांधकामात सहभागी असलेल्या कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध भाषेत परमात्म्याचं स्मरण करण्यात आलं.

Advertisements
Advertisements

टाटा प्रोजेक्टस लिमिटेडकडून नव्या संसद भवनाची उभारणी करण्यात आली आहे. या संसद भवनात लोकसभा राज्यसभा यासह भव्य संविधान कक्ष, खासदारांसाठी लाऊंज पुस्तकालय, समिती कक्ष, भोजन क्षेत्र आणि पार्किंग व्यवस्था असेल.

त्रिकोणी आकाराच्या चार मजली इमारतीचं क्षेत्रफळ ६४ हजार ५०० वर्ग मीटर इतकं आहे. या संसद भवनाला तीन प्रवेश द्वारं आहेत. त्यामध्ये ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार आहे. सामान्य व्यक्ती आणि महत्त्वाच्या व्यक्तीसाठी वेगवेगळी प्रवेशद्वारं आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button