मुख्य बातमी

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट

मुंबईः फेब्रुवारीमध्ये उन्हाचा कडाका असह्य झाला होता. मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलातचा हवामानात बदल झाला आहे. आजपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चार ते सहा मार्चपर्यंत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळं पिकांना फटका बसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती तसेच अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं चार ते ८ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहिल तसंच अवकाळी पावसाची शक्यता आहे. पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण मध्य प्रदेश व गुजरात आणि उत्तर कोकण या भागांवर परिणाम होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिक जिल्ह्यात हलक्या सरींसह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर, रविवार आणि सोमवार मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे.

विदर्भात सर्वत्र पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात मेघगर्जनेसह वीजा आणि हलक्या सरींची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात ४ ते ६ मार्च दरम्यान अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात.

Advertisements
Advertisements

अवकाळी पावसाचा पिकांना फटका

अवकाळी पावसामुळं पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. द्राक्ष काढणीला आल्याने त्यातच पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button