मराठवाड़ामुख्य बातमी

मुलीला वाचवायला गेला, स्कूटी घसरली; स्कूलव्हॅनच्या चाकाखाली आल्याने भावी डॉक्टरचा मृत्यू

नांदेड: रस्त्यावरून चालणाऱ्या एका मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात स्कूटीचालक स्कूल व्हॅनखाली सापडून ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही मन हेलावून टाकणारी घटना नांदेड शहरातील पीर नगर भागात घटना घडली आहे. अपघाताचा थरार सीसीटिव्ही कैमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होतं आहे. अरबाज सय्यद ( वय १८) असं मयत युवकाचे नाव आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, अरबाज सय्यद हा मूळ भोगाव येथील रहिवासी आहे. नीट परीक्षेच्या तयारीसाठी तो आसरा नगर येथे आपल्या मामाकडे राहत होता. त्याने खाजगी शिकवणी देखील लावली होती. २६ जुलै रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास तो स्कुटीवरुन शिकवणी केंद्राकडे जात होता. पीर नगर भागातून जात असताना स्कुल व्हॅन वेगाने विरुद्ध दिशेने यात होती. तसेच सय्यद अरबाज याच्या गाडीचा वेग देखील जास्त होता.

दरम्यान, याच रस्त्यावरून एक मुलगी पायी जातं होती. आपल्या गाडीचा धक्का मुलीला लागू नये म्हणून अरबाजने त्या मुलीला कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र , त्याच्या गाडीचा धक्का त्या मुलीला लागला आणि ती मुलगी खाली पडली. घटनेनंतर स्कुटी स्लीप झाल्याने अरबाज हा स्कुल व्हॅनच्या चाकाखाली आला. स्कूल व्हॅनचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Advertisements
Advertisements

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अरबाज याला रुग्णालयात नेण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंगाचा थरकाप उडवणारी घटना परिसरातील सीसीटीव्ही कैमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाचा नियतीने घात केल्याने हळहळ व्यक्त होतं आहे. या घटनेने मयत अरबाज याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button