जगात जर्मनीजिंतूरपरभणीमराठवाड़ामुख्य बातमी

माजी मंत्री ॲड. गणेशराव दुधगांवकर गौरव ग्रंथ प्रकाशना निमित्त खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

परभणी :

माजी मंत्री व खासदार ॲड. गणेशराव नागेराव दुधगावकर ( शिंदेशाही राऊत ) यांच्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव (कृतज्ञता सोहळा) म्हणुन गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्ताने जागतिक खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले असून लाखमोलाची बक्षीस प्रदान केली जाणार आहेत.

या वक्तृत्व स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा  व आकर्षक बक्षिसे  मिळवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ही वक्तृत्व स्पर्धा दोन वयोगटात घेण्यात येणार आहे. पहिला वयोगट हा १६ ते ३० वर्ष तर दुसरा वयोगट ३० वर्ष व त्यापुढील असे आहे.

Advertisements
Advertisements

या स्पर्धेचा विषय हा “जनसेवक गणेशराव दुधगांवकर म्हणजे कर्मयोगी, विकास पुरुष, सत्यआग्रही कि ज्ञानोपासक??” असा आहे.

या स्पर्धेत विजेत्यांना ₹ २. २५  लाख पर्यंत बक्षिसे आहेत. त्याचबरोबर डिजीवीर पुरस्कार देण्यात येणार आहे. यात सर्वाधिक वेळेला बघितला गेलेला यूट्यूब/ सोशल मीडियावरील व्हिडियो यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. १० ऑक्टोबर पर्यंत www.Shinde.World/vaktrutva-spardha-Parbhani या वेबसाईट लिंक द्वारे कारकिर्दी बाबतचे विस्तृत पीडीएफ सहभागी होणाऱ्यांना वाचता येईल व सहभाग नोंदवता येईल.

आपला स्वतःचा १२ ते १५  मिनिटांचा व्हीडिओ बनवून +9194 2293 5407 या मोबाइल नंबरवर पाठवावा. त्यासोबत आपले संपूर्ण नाव, गाव, पत्ता, वय व शिक्षण दिलेल्या नंबर वर पाठवावा. आपले वय दर्शवणारे ओळखपत्र देखील पाठवावे. निवड झालेल्यांना १४ऑक्टोबर पर्यंत कळवण्यात येणार असून त्यांनी  १८ ऑक्टोबर रोजी अंतिम स्पर्धेसाठी online/offline यावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

https://shinde.world/

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button