देश -विदेश

सिनेमाच्या सेटवर शाहरूख खानचा मोठा अपघात

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा लॉस एंजेलिसमध्ये अपघात झाला आहे. सध्या त्याच्या आगामी सिनेमाचे येथे चित्रीकरण सुरू असून सेटवर मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये शाहरूख जखमी झाला आहे.

शाहरूखला दुखापत झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतकेच नाही तर त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली. याविषयी एका वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरूख लॉस एंजेलिसमध्ये त्याच्या सिनेमाचे चित्रीकरण करत आहे.

या सिनेमाचे चित्रीकरण सुरू असताना शाहरूखच्या नाकावर मोठा आघात झाला. ज्यामुळे त्याच्या नाकातून प्रचंड रक्त यायला लागले. त्यानंतर त्याला तातडीने येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, काळजी करण्याचे कारण नाही. परंतु, नाकातील रक्त थांबवण्यासाठी त्यांना एक लहानशी सर्जरी करावी लागली आहे.

Advertisements
Advertisements

नाकाची सर्जरी झाल्यानंतर शाहरूखने थेट त्याचे मुंबईतले घर गाठले आहे. शूटिंग अर्ध्यावर सोडून तो भारतात परत आला आहे. शाहरूख एकाच वेळी अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. दरम्यान, लवकरच शाहरूखचा ‘जवान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा १२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच तो ‘डंकी’आणि ‘टायगर वर्सेस पठाण’ या सिनेमातही दिसणार आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button