महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

मी देखील आता सर्व उघड करतो, SIT चौकशीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात देखील गाजताना पाहायला मिळत असून, आशिष शेलार यांच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, यावर मनोज जरांगे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. “देवेंद्र फडणवीस  हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. मी कुठेच चुकीचं नाही आणि कुठेच गुंतू शकत नाही. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून, फेस कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “मी मराठ्यांचे काम करतोय.  ते सत्तेचा वापर करणार आहे. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. न्यायचं त्या तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत. आता म्हणाले  तर मी सलाईन उचलून चौकशीला येतो.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button