Uncategorized

तिस-या ऐतिहासिक धम्म पदयात्रेचे थायलंड (बँकॉक ते नाखोन सावन) येथे आयोजन, आयोजक डॉ सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची माहिती

*बौद्ध धम्माचा महान वारसा धम्मभूमी थायलंड येथे रूजवण्यासाठी तिस-या ऐतिहासिक धम्म पदयात्रेचे थायलंड (बँकॉक ते नाखोन सावन) येथे आयोजन*

थायलंड देशात ऐतिहासिक भव्य श्रामणेर दीक्षा समारंभ व धम्मपद यात्रेचे आयोजन – डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे

Advertisements
Advertisements

– भारतातून पहिल्यांदाच थायलंड येथे गगन मलिक फाऊंडेशन ,आश्रय फाऊंडेशनच्या वतीने समारंभ –

परभणी – थायलंड देशात पहिल्यांदाच गगन मलिक फाऊंडेशन ,आश्रय फाऊंडेशन व त्रिरत्नभूमी सोसायटी थायलंड वेट देट थोंगच्या वतीने, रॉयल बौद्ध विहार बँकाक येथे दि.२१ डिसेंबर २०२३ रोजी भिक्खू श्रामनेर दीक्षा समारंभ व दि.४ जानेवारी ते ११ जानेवारी पर्यंत भव्य ऐतीहासिक धम्मयात्रेचे आयोजन करण्यात आले असून भारतातून थायलंड देशात पहिल्यादांच हा समारंभ आयोजित केला आहे, अशी माहिती डॉ सिद्धार्थ हत्तीअंबिरे, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
कमिटी अनु.जाती विभाग यांनी दिली आहे.
थाई भिक्खू संघाच्या व मान्यवरांच्या उपस्थित हा ऐतीहासिक समारंभ होणार असून थायलंड येथे आयुथया ते नाखून सावन पर्यंत आयोजित धम्मयात्रेत ४७ भिक्खू व ३३ उपासकांचा सहभाग राहणार आहे. एक महिनाभर श्रामणेर भिक्खू यांना धम्मदीक्षा देण्यात येणार आहे .
हा समारंभ थायलंड येथील फ्रा धिरनामुनी आणि थाई भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली होणार असून या वेळी वेट थोंग रॉयल बुद्ध विहार , फ्रा राजवरोयनानसोफेन, फ्रा ब्रम्हावाजिराकोर्न , फ्रा धम्मसाक्यावोंगविसुधी इत्यादी प्रमुख भिक्खू संघाची उपस्थिती राहणार आहे. या समारंभास विशेष अतिथी म्हणून थायलंड मधील भारताचे राजदूत नागेश सिंग यांची उपस्थिती राहणार आहे . समारंभास थायलंड प्रधानमंत्री कार्यालय , थाई आर्मी, बौद्ध अनुयायाचा पाठिंबा आहे. या कार्यक्रमास धम्म अनुयायाने उपस्थित राहण्याचे आवाहन गगन मलिक फाऊंडेशन,आश्रय फाऊंडेशनच्या वतीने डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु. जाती विभाग यांनी केले आहे

परभणी

विशेष

==============
बौद्ध धम्माचा ऐतिहासिक महान वारसा धम्मभूमी थायलंड येथे रूजवण्यासाठी 100 भिक्खु, श्रामणेर संघ तसेच भारत व थायलंड येथील उपासकांचा समावेश असलेलल तिसरी ऐतिहासिक धम्म पदयात्रा दि.20 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या धम्मपदयात्रेचा प्रस्थान सोहळा थायलंडच्या बँकॉक येथे होणार असून समारोप प्राचीन बौद्ध विहार असलेल्या नाखेन सावन या शहरात होणार आहे. आश्रय सेवाभावी संस्था, त्रिरत्नभूमी सोसायटी व गगन मलिक फाऊंडेशनच्यावतीने या तिस-या ऐतिहासिक धम्मपदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर धम्मकार्याची संधी मिळत आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे.
नमो बुद्धाय..!
सप्रेम जयभीम..!!
……………………
डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे
आयोजक, तीसरी धम्मपदयात्रा, थायलंड

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button