गंगाखेडला आतिषबाजीसह ५१ फुटी पुतळ्याचे होणार दहन !,आ. डॉ. गुट्टे, जिल्हाधिकारी गावडे यांच्या ऊपस्थितीत
*गंगाखेडला आज आतिषबाजीसह अपप्रवृत्तीच्या ५१ फुटी पुतळ्याचे होणार दहन !*
🔹आ. डॉ. गुट्टे, जिल्हाधिकारी गावडे यांच्या ऊपस्थितीत रंगणार सोहळा 🔹
गंगाखेड : गंगाखेडच्या ऐतिहासीक दसरा महोत्सवाचा आनंद वाढवणारा नेत्रदीपक आतिषबाजीसह अपप्रवृत्तीच्या ५१ फुटी पुतळा दरवाजा कार्यक्रम ऊद्या संपन्न होणार आहे. गंगाखेडचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविणार असून ऊद्घाटन म्हणून परभणीचे जिल्हाधिकारी डॉ. रघुनाथ गावडे हे ऊपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने हजर रहावे, असे आवाहन श्री साईसेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, सचिव नागेश पैठणकर व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध रथ परिक्रमेनंतर आतिषबाजी आणि अपप्रवृत्ती पुतळा दहनाची परंपरा गेल्या २३ वर्षांपासून सुरू आहे. साईसेवा प्रतिष्ठाणच्या या सोहळ्यास पचक्रोशीतील हजारो अबालवृद्ध, नागरिकांची मोठी गर्दी असते. अपप्रवृत्तीचा ५१ फुटी पुतळा बनवण्याचे काम हिंगोली येथील विठ्ठल भुसांडे, नितीन परडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुर्ण केले असून बीड जिल्ह्यातील कलाकार आताषबाजीची तयारी करत आहेत. यावर्षीही प्रिभुषन नृत्य अकादमी, स्टार डान्स स्टुडीओ यांच्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जि. प. प्रा. शाळा शिवाजीनगर तांडा येथील संत सेवालाल ग्रुप आपली लोककला सादर करणार आहे. तसेच गंगाखेड शहरातील शिक्षण आणि क्रिडा क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार केला जाणार आहे. यात कुस्तीपटू चंद्रकांत बिडगर, आयआयटी गुणवत्ताधारक अदनान पटेल, गौरी चेऊलवार, कबड्डीपटू निकीता लंगोटे, नेमबाज गौरी जोशी यांचा गौरव केला जाईल.
गंगाखेडचे आ. रत्नाकर गुट्टे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर जिल्हाधिकारी डॉ. श्री रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ऊद्घाटन संपन्न होईल. या प्रसंगी माजी सभापती बाळकाका चौधरी, ऊद्योजक सुनील गुट्टे, जि. प. सदस्य प्रल्हाद मुरकुटे, रासपा जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप अळनुरे, सभापती साहेबराव भोसले, मा. सभापती बालासाहेब निरस, किशनराव भोसले, गणेशराव रोकडे, संभाजी पोले, प्रा. डॉ. आत्माराम टेंगसे, राजेंद्र डोंगरे, ॲड संतोष मुंडे, अनिल यानपल्लेवार, अश्फाकभाई, गोपी मुंडे पत्रकार दिलीप माने, नजीर खान, विशाल माने, पंकज क्षीरसागर, राजेश काटकर, गजानन देशमुख, रमेश कातकडे, राहुल डोंगरे ईतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून ऊपस्थित राहणार आहेत.
ऊद्या दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता गोदातटावर संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी हजर रहावे, असे आवाहन संयोजक तथा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, सचिव नागेश पैठणकर, सह संयोजक विजयकुमार तापडिया, सुशांत चौधरी, हाजी गफार शेख, शेख युनुसभाई, संतोष तापडीया, नंदकुमार भरड, गजानन महाजन, कल्याण तुपकर, मनोज नाव्हेकर, रमेश औसेकर, संदीप कोटलवार, किरण जोशी, सचिन नाव्हेकर, गुंडेराव देशपांडे, बालासाहेब यादव, जगदिश तोतला, राजेंद्र पाठक, पंकज भंडारी, राजू गळाकाटू, कारभारी निरस, हरीभाऊ सावरे, मनमोहन झंवर, दिलीप सोळंके, कृष्णा पदमवार, अभिनय नळदकर, अंबादास राठोड, अतुल गंजेवार, भगत सुरवसे, गोविंद रोडे, बंडू वडवळकर, राजू लांडगे, बाळासाहेब राखे, लाला अनावडे, गजानन जोशी, अमोल कोकडवार, अतुल तुपकर, मकरंद चिनके, शाम कुलकर्णी, कैलास वाघमारे, नरेंद्र नळदकर आदिंच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यंकटेश यादव, सुहास देशमाने, किरण यादव, भारत गोरे, प्रथम यादव, एलाप्पा शंकुवाड आदिंसह प्रतिष्ठाणचे सदस्य वतीने करण्यात आले आहे.