विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये परभणीचा दबदबा कायम
• पुढील वर्षी परभणी जिल्ह्याला यजमानपदाचा मान
परभणी,
: औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्याने आपला दबदबा सलग दुसऱ्या वर्षी कायम ठेवला असून, जिल्हा महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सर्वसाधारण विजेतेपदांमध्ये द्विलतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. तर औरंगाबाद विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या यजमानपदाचा मान परभणी जिल्ह्याला मिळाला आहे.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर तीन दिवस पार पडलेल्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, डॉ. सुशांत शिंदे, निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, अरुण जऱ्हाड, सुधीर पाटील, शैलेश लाहोटी परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी प्रतीक्षा भुते यांच्यासह तहसीलदार, नायब तहसीलदार आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
औरंगाबाद विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांत विभागातील सर्व जिल्ह्यांनी 82 क्रीडा प्रकरात सहभाग नोंदविला होता. परभणी जिल्ह्याने या स्पर्धेत एकूण 311 गुणांसह सलग दुस-या वर्षी द्विोतीय क्रमांक पटकाविला तर 332 गुणांसह नांदेड प्रथम क्रमांकावर राहिले. या क्रीडा महोत्सवात परभणी जिल्ह्या ने जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली नेत्रदिपक कामगिरी बजावली असून, उद्घाटन समारंभानंतर गणेश चव्हाण यांच्या नेतृत्वात अत्यंत शिस्तबद्धरितीने झालेल्या परेड संचलनात परभणी जिल्ह्याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
तसेच रंगारंग पद्धतीने झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात संबळ वादन, संत गोरोबा काका हा विशेष कार्यक्रम तर ‘सताड उघडं’ हे नाटक, मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यावर आधारित समूह नृत्य, युगल गीत तसेच ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या समूहगिताचे सादरीकरण करण्यात आले असून सांस्कृतिक कार्यक्रमामध्येही जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकावला.
नुकताच औरंगाबाद येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा महोत्सव पार पडला. या क्रीडा महोत्सवात जिल्हाधिकारी आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नेत्रदिपक कामगिरी बजावली. त्याच बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमातही बाजी मारली.
क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सोमवारी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यात महसूलच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत सांस्कृतिक स्पर्धेचे तिसऱ्या क्रमांकाचे पारिताषिक मिळवले. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या नियोजनाखाली एड्सग्रस्तांना समाजप्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘एक पाऊल संवेदनशिलतेचे’ या विषयावर सादरीकरण करण्यात आले.
मैदानी सांघिक क्रीडा स्पर्धेत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नेतृत्वात खेळलेल्या महिला थ्रो-बॉल स्पर्धेत संघाने अंतिम सामन्यात औरंगाबादचा पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला तर क्रिकेटमध्ये अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्याने अंतिम सामन्यात बीडचा 56 धावांनी पराभव केला. मनिषा ताठे यांच्या नेतृत्वात महिला खो-खो संघाने परभणी विरुद्ध नांदेडच्या अंतिम सामन्यात नांदेड संघाचा पराभव करत पहिल्या स्थानी राहिला. तर फुटबॉलच्या अटीतटीच्या आणि अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात परभणीला औरंगाबादविरुद्ध पेनल्टी शुटऑऊटमध्ये 5-4 गोलच्या फरकाने द्वि्तीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
तसेच विविध वैयक्तिक मैदानी स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेत्रदिपक कामगिरी बजावली असून महिला थाळी फेक प्रकारात आंचल गोयल, लॉन टेनिस एकेरी तहसीलदार सखाराम मांडवगडे प्रथम, लॉन टेनिस दुहेरी प्रकारात सखाराम मांडवगडे व ओमप्रकाश गौंड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर कॅरम एकेरी राजू ससाणे प्रथम, गोळा फेक कालीदास शिंदे प्रथम, रिंग टेनिस एकेरी (महिला) तहसीलदार पल्लवी टेमकर प्रथम, रिंग टेनिस दुहेरी प्रकारात (महिला) पल्लवी टेमकर व स्वप्ना अंभोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
थाळी फेक (45 वर्षावरील) प्रकारात उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर बॅडमिंटन दुहेरी (45 वर्षावरील) प्रकारातही अरुणा संगेवार व स्वप्ना अंभोरे प्रथम क्रमाकाला गवसणी घातली.
याशिवाय धावणे रिले 100×4 प्रकारात रंजित डुकरे, सुरेश ढोक, अशोक मोगल, भास्कर भुसे प्रथम आले. तसेच धावणे रिले 400×4 प्रकारात दत्तो पंत वाघमारे, दशरथ आसोलेकर, अशोक मोगल, भास्कर भुसे हे प्रथम आले. धावणे 200 मी. (45 वर्षावरील) अंतराम मुंढे, पोहणे 100 मी. बॅकस्ट्रोक गोविंद दुगाणे, पोहणे 50 मी ब्रेस्ट स्ट्रोक कालीदास शिंदे, पोहणे 50×4 मी. रिले आणि 50 मीटर बॅकस्ट्रोक या दोन्ही प्रकारात गोविंद दुगाणे, अमोल होळंबे यांनी अनुक्रम प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.
उंच उडी क्रीडा स्पर्धेत शिवाजी शिंदे, लांब उडी आणि गोळा फेक सचिन तांदळे, पोहणे 100 मी बॅकस्ट्रोक आणि 50×4 मिडल रिले प्रकारात दिलीप गोडबोले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. पोहणे 50 मी फ्री स्टाईल कालीदास शिंदे द्वितीय, कॅरम दुहेरी दिलीप गोडबाले व राजू ससाणे द्वितीय क्रमांक, तर थाळी फेक कालीदास शिंदे द्वितीय क्रमांकावर राहिले.
45 वर्षावरील बॅडमिंटन प्रकारात एकेरीमध्ये विजय बोधले, तर मिश्रमध्ये विजय बोधले व स्वप्ना अंभोरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. धावण्याच्या शर्यतीमध्ये 100×4 मीटरमध्ये (महिला) गीता बावणे, राजश्री देसाई, मनिषा ताठे, निकीता बिबेकर द्वितीय, धावणे रिले 100×4 (45 वर्षावरील) अरुणा संगेवार, छाया पवार, अहिल्या आतकरे, शहाणे या द्वितीय राहिल्या. कॅरम एकेरी प्रकारात (महिला) अर्चना गायकवाड, गोळा फेक (45 वर्षावरील) सुमन मोरे, टेबल टेनिस दुहेरी (45 वर्षावरील) अरुणा संगेवार व स्वप्ना अंभोरे द्वितीय क्रमांकावर राहिल्या आहेत.
धावण्याच्या क्रीडा स्पर्धेत 400 मीटर उज्ज्वल तवर, 100 मीटर (महिला) गीता बावणे, 400 मीटर (45 वर्षावरील) अनुराधा शहाणे, रिले 100×4 मी. (45 वर्षावरील) लोखंडे, अंतराम मुंढे, कर्णकुमार जायभाये, थाळी फेक अनिल राऊत, गोळा फेक (महिला) जिल्हाधिकारी आंचल गोयल, लांब उडी विजय मोरे, लांब उडी (45 वर्षावरील) अहिल्या आतकरे, पोहणे 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक अमोल होळंबे, पोहणे 50 मीटर बॅकस्ट्रोक दिलीप गोडबोले, 200 मीटर धावणे (महिला) राजश्री देसाई आणि 400 मीटर धावणे क्रीडा प्रकारात महिला गटामधून गीता बावणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
जिल्हाधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. तसेच महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकूंद आष्टीकर, शिपाई संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप डहाळे, वाहनचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष कच्छवे तसेच कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरर बुलबुले यांनीही सर्व विजयी खेळाडू अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
*****