Uncategorized

कलेक्टर,एस पी, आर डी सी, सी.एस यांचा परभणीत पाहणी दौरा

 

जिल्हाधिका-यांकडून जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयाची पाहणी

 

परभणी, 

: शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या निर्माणाधीन इमारत बांधकामाची जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज बांधकामस्थळी जावून पाहणी करत संबंधितांना बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.

Advertisements
Advertisements

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आर. रागसुधा, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. बी. चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शासकीय स्त्री रुग्णालयाच्या उद्वाहन व्यवस्था, सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था, अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग, विद्युतजोडणी यंत्रणा, बाहेरील संरक्षण भिंत आणि यासह इतर विकासकामांचा प्रगती पथावर असलेल्या बांधकामाचा आढावा त्यांनी घेतला.

स्त्री रुग्णालय परिसरातील जागेवरील अतिक्रमणाची खात्री करण्यासाठी महानगरपालिका आणि स्त्री रुग्णालय प्रशासनाचे संयुक्त पथक स्थापन करून अतिक्रमणधारकांकडून त्याची कागदपत्रे तपासून घेणे आणि अतिक्रमण केल्याचे आढळून आल्यास त्यांना निर्धारित कालावधीत ते स्वत:तून काढून घेण्याबाबतचे आदेश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. तसेच त्याबाबतचा अहवाल तात्काळ‍ सादर करण्यास सांगितले.

रुग्णांच्या सेवेत हे रुग्णालय लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बांधकाम पूर्ण झालेले मजले 15 फेब्रुवारीपासून हस्तांतरीत करावेत. येथील पाणीपुरवठा, आगप्रतिबंधक उपाययोजना, विद्युतजोडणी, आवश्यक पायाभूत सोयीसुविधांच्या बांधकामाची पाहणी केली. रुग्णांच्या सेवेत हे रुग्णालय लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक-एका माळ्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले. प्रलंबित कामांची यादी तयार करून ती निर्धारित वेळेत पूर्ण करा. इमारत परिसरातील पार्किंग, पदपथ, पथदिवे, मलनिस्सारण वाहिनी, स्वयंपाकगृह, दक्षता विभागाबाबत त्यांनी यंत्रणेकडून आढावा घेतला.

तसेच या भागात नवीन पोलीस चौकी आणि शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासाठी पोलीस विभागाला जागेची आवश्यकता असून, त्यासाठी या परिसरात उपलब्ध असलेल्या जागेची जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आर. रागसुधा यांनी पाहणी केली.

******

 

 

 

 

 

 

 

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button