परभणी
* Trap Case Report*
➡ *युनिट :-* परभणी
➡ *तक्रारदार :-* पुरुष, वय 42 वर्षे
➡ *आरोपी लोकसेवक:-*
सूर्यकांत रंगनाथराव राऊत, वय 56 वर्षे, व्यवसाय – नोकरी (सहाय्यक पोलीस उप निरीक्षक ASI ) नेमणूक – पोलीस ठाणे पाथरी जि. परभणी मुळ रा. पारीजात कॉलनी सेलु, ह. मु. ओंकार नगर, पाथरी जि. परभणी
➡ *तक्रार प्राप्त:-*
दि. 20/01/2023
➡ *लाच मागणी पडताळणी:-*
दि. 21/01/2023
➡ *लाचेची मागणी रक्कम:-* रु. 20,000/-
➡️ *लाच स्वीकृती दिनांक:-* दिनांक 21/01/2023
➡ *लाचेची स्वीकारली रक्कम:-* रु.10,000/-
➡ *थोडक्यात हकिकत:-*
यातील तक्रारदार यांचेवर, त्यांच्या मुलावर व त्यांच्या भावावर पोलीस ठाणे पाथरी येथे गु.र.नं. 569/2022 कलम 323, 324, 34, 504, 506 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयामध्ये तक्रारदार यांना, त्यांच्या मुलाला व भावाला जामीन मिळुन देण्यासाठी व गुन्ह्यात मदत करणेसाठी आरोपी लोकसेवक यांनी 20,000/- रू. लाचेची मागणी करून त्यापैकी 10,000/- रू लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वतः स्विकारलेली आहे.
आलोसे यांना ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालु आहे.
➡ मार्गदर्शक:-
डॉ राजकुमार शिंदे
पोलीस अधीक्षक,
ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड.
श्री. धरमसिंग चव्हाण
अपर पोलीस अधीक्षक,
ला.प्र.वि.नांदेड, परिक्षेत्र नांदेड.
➡ पर्यवेक्षण अधिकारी:-
श्री किरण बिडवे,
पोलीस उप अधीक्षक,
ला.प्र.वि. परभणी.
➡ सापळा अधिकारी :-
श्री. सदानंद वाघमारे,
पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि. परभणी.
➡ सापळा कारवाई पथक:-
पोलीस निरीक्षक जकिकोरे, पोह/अनिल कटारे, चापोह/जनार्दन कदम, पोशि/अतुल कदम, पोशि/ मुख्तार शेख, पोशि/विकास तायडे, ला.प्र.वि. युनिट परभणी.
➡ तपास अधिकारी :-
श्री. सदानंद वाघमारे,
पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि. परभणी
———————-
*परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र,नांदेड
मोबाईल क्रमांक 9623999944
किरण बिडवे, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. परभणी
मोबाईल क्रमांक –
*कार्यालय दुरध्वनी – 02452-220597*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*