परभणी
विशेष
बाबाजानी व्हर्सेस सईद खान असा संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर येतो आहे. एक ऑडिओ आणि व्हिडिओ आज पुन्हा समाज माध्यमांच्या सोशल मीडियावर व्हायरल होत राहिला आणि या संघर्षाची किनार आणखी वाढत राहिली
गेल्या काही दिवसापासून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या सईद खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुरानी यांना शह देण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले.
त्यांनी पाथरी तालुक्यातील मानवत तालुक्यातील पालम तालुक्यातील ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच आणि पाथरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये प्रवेश घडवला.
त्यानंतर दोघातील दरी मोठी वाढली.
दोघांनी पत्रकार परिषदा घेतल्या एकमेकांवर आरोप झाले. प्रत्यारोप ही झाले .
कोणाचे किती सरपंच कोणत्या गटात गेले यावरही मोठ्या चर्चा रंगल्या. त्यावर चर्चाही घडल्या..
खानविरुद्ध खान असा सामना घडतो आहे माजी मंत्री तथा शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांना बाबाजानी भेटले असा खान यांचा दावा…. कोतकर यांच्याशी बाबाजानी यांनी केलेली दूरध्वनीवरून बातचीत ….त्याचा ऑडिओ….. मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे
आणि यातच पुन्हा एकदा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे…
एकमेकांवर शह देण्याची पुरेपूर खेळी मोठ्या प्रमाणात खेळली जात आहे.