“संविधान के राह”
परभणी
विशेष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचीत जाती विभागाचे शिर्डी येथे २ दिवसीय राज्यस्तरीय शिबिर
अनुसूचित जाती विकासाचे धोरण,सध्याची राजकीय परिस्थिती इतर विषयांवर होणार शबीर
काँग्रेसच्या वरिष्ट नेत्यांसह अनुसुचित जाती विभागाचे सर्व नेते पदाधीकारी राहणार उपस्थित
राज्यातील अनुसुचित जातींच्या बाबतीतील अडी-अडचणी त्यांच्या विकासाचे धोरण,सध्याची राजकीय परिस्थिती तसेच इतर महत्वांच्या विषयांवर सांगोपांग चर्चा घडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचीत जाती विभागाच्या वतीने शिर्डी येथे “संविधान के राह” या २ दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार असून अत्यंत महत्वाच्या अशा या प्रशिक्षण शिबिराला राज्यभरातील अनुसूचीत जाती विभागाच्या सर्व कार्यकर्त,पदाधीकारी,नेते सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील हॉटेल साई पालखी निवारा येथे दिनांक २ व ३ ऑक्टोबर २०२३ या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन अत्यंत महत्वपुर्ण अशा दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिरासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मा.खा. मुकुल वासनिक साहेब (सरचिटणीस अ.भा. काँग्रेस), के. राजू सर (राष्ट्रीय समन्वयक CWC सदस्य), मा. राजेश लिलोठिया साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष अनू. जाती विभाग), मा. आ. नानाभाऊ पटोले साहेब (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), मा.आ.अशोकराव चव्हाण साहेब (माजी मुख्यमंत्री CWC सदस्य), मा. आ. बाळासाहेब थोरात (माजी मंत्री), मा. सचिनराव (CWC सदस्य), मा.आ.विजय वडेट्टीवार (विरोधी पक्षनेते महा.राज्य), मा.वर्षाताई गायकवाड (अध्यक्ष मुंबई काँग्रेस), मा.आ.नितिन राऊत (माजी मंत्री), मा.आ.विश्वजित कदम (माजी मंत्री), मा. मनोज बागडी (माजी महाराष्ट्र प्रभारी), मा. अतुल लोंढे (प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस), मा. आ. लहू कानडे हे उपस्थित राहणार आहेत.तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचीत जाती विभागाचे सर्व प्रदेश पदाधिकारी, महिला विभाग, सोशल मीडिया विभाग, अॅट्रासिटी समन्वयक, जिल्हाध्यक्ष शहर-जिल्हाध्यक्ष यांनी शिर्डी येथे दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ठीक ०८:०० वाजता उपस्थित राहून आपली नोंदणी करत सकाळी ठीक ०९:०० वाजता प्रारंभ होणाऱ्या शिबिरास हजर राहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी केले आहे.
हे राज्यभरातील नावाजलेले वक्ते करणार मार्गदर्शन
वक्ते म्हणून मा. सिद्धार्थ शिंदे (ज्येष्ठ विधितज्ञ हायकोर्ट औरंगाबाद), मा.अमर खानापुरे (प्रदेश कॉंग्रेस प्रशिक्षक समन्वयक), आशुतोष शिर्के (ज्येष्ठ विचारवंत), मा. सुधीर गव्हाणे (माजी कुलगुरू), मा. रावसाहेब कसबे (ज्येष्ठ आंबेडवादी विचारवंत), उत्तम कांबळे (संपादक दै. सकाळ), राम पुणयाणी व आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.