वाट्टेल ते करील पण गंगाखेड पाणी पुरवठा प्रश्न सोडवेन, भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांची ग्वाही
वाट्टेल ते करील पण गंगाखेड पाणी पुरवठा प्रश्न सोडवेन, भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांची भूमिका
गंगाखेडच्या सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी सर्वार्थाने वाटेल ते प्रयत्न करु
संतोष मुरकुटे यांची माहिती
परभणी,
विशेष
: गंगाखेड शहरास पाणी पुरवठा करणार्या मासोळी प्रकल्पात केवळ 2 टक्केच जीवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईचे संकट ओळखून आतापासूनच प्रशासनास मरगळवाडी येथील तलावातून किंवा अन्य भागातून पाणी खेचून आणता येईल का? या दृष्टीने पर्यायांचा गांभीर्याने विचार विनिमय करावा लागेल, असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवार दि. 24 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुरकुटे यांनी मासोळी या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे.
या प्रकल्पातून गाळाचा उपसा केला तर निश्चितच प्रकल्पाची क्षमता वाढणार आहे. परंतु, अनेक वर्षांपासून या प्रकल्पातील गाळाचा उपसाच करण्यात आला नाही. त्यामुळेच या प्रकल्पात नेमका किती जिवंत पाणीसाठा आहे याचा अंदाज येत नाही, असे नमूद केले.
गंगाखेडवासीयांचे भविष्यात टंचाईचे संकट ओळखून पर्यायांचा विचार करावा लागेल. त्या दृष्टीने जलशुध्दीकरण केंद्राजवळील मरगळवाडी येथील तलावातून पाणी घेता येईल का? याचाही विचार करावा लागेल. तरच पाण्याचा प्रश्न सुटेल.
दरम्यान, या दृष्टीने आपण मासोळी व मरगळवाडी या दोन्ही प्रकल्पांना भेटी देणार आहोत.
प्रशासकीय पातळीवर सर्वार्थाने प्रयत्न करणार आहोत. वेळ पडली तर आपण स्वःखर्चाने या योजनेच्या यशस्वीतेकरीता काहीशे प्रयत्न करु, असा विश्वास मुरकूटे यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे, विठ्ठलराव रबदडे, व्यंकटराव तांदळे, दीपक मुरकुटे, नंदकुमारे बल्लोरे, प्रशांत फड, अमोल दिवाण, मनोहर महाराज केंद्रे आदी उपस्थित होते.