Uncategorized

ऋतुराजचं वादळी शतक, कांगारुपुढे 223 धावांचे आव्हान

ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात 222 धावांचा डोंगर उभरला. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी छोटेखानी खेळी करत धावसंख्या वाढवली. ऑस्ट्रेलियाकडून एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 223 धावांचे आव्हान मिळालेय.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या 24 धावांवर भारताचे आघाडीचे दोन फलंदाज माघारी परतले. यशस्वी जायस्वाल सहा धावा काढून बाद झाला तर ईशान किशन याला खातेही उघडता आले नाही. दोन विकेट झटपट पडल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने ऋतुराजच्या साथीनेल भारताचा डाव सावरला.

सूर्यकुमार यादव आणि ऋतुराज गायकवाड यांनी तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 57 धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. सूर्यकुमार यादव झंझावती फलंदाजी करत असताना ऋतुराज संयमी खेळत होता. सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत दोन षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने 39 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. सूर्याला साथ देणारा ऋतुराज गायकवाड याने नंतर गियर बदलला.

Advertisements
Advertisements

कर्णधार तंबूत परतल्यानंतर ऋतुराज गायकवाडने सुत्रे हातात घेतील. ऋतुराज गायकवाडने तिलक वर्माला साथीला घेत धावसंख्या वेगाने वाढवली. ऋतुराज आणि तिलक वर्मा यांच्यामध्ये शतकी भागिदारी झाली. यामध्ये ऋतुराज गायकवाडचा मोठा होता. ऋतुराज गायकवाड याने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. ऋतुराज गायकवाडने टी 20 मधील पहिले शतक ठोकले. ऋतुराजने षटकार मारुन शतक ठोकले. ऋतुराजने 52 चेंडूत शतकाला गवसणी घातली.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button