Uncategorized

दो आमदारोंका संचालक पद गया,आ.बाबाजानी,आ.मुटकुळे यांचे संचालकत्व रद्द

आ.बाबाजानी,आ.मुटकुळे यांचे संचालकत्व रद्दबातल
परभणी,

विशेष

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी व भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांचे संचालकत्व विभागीय सहनिबंधकांनी आज रद्दबातल केले आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत या दोघा आमदार महोदयांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी त्या दोघांच्या सहकारी संस्थेवर बँकेची मोठी थकबाकी होती. सहकारी संस्थेवरील थकबाकी असताना सुद्धा या दोघांनी माहिती लपवली व निवडणूक रिंगणातून संचालकत्व मिळवले.
दरम्यान या दोघांच्या यांच्या या कृतीविरोधात बँकेचे माजी संचालक तथा बाबाजानी त्यांचे प्रतिस्पर्धी अँड.स्वराजसिंह परिहार यांनी सहकार खात्याकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची सहकार खात्याने गांभीर्याने दखल घेतली. पाठोपाठ सुनावणी अखेर बँकेचे या दोघांचे संचालकत्व विभागीय सहनिबंधक गुट्टे यांनी सोमवारी सकाळी एका निर्णयावर निर्णयाद्वारे रद्दबातल केले.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button