परभणी
: *ब्राह्मण समाजासाठी परशुराम विकास महामंडळ मंजूर करण्यात यावे व शासनाने त्याचा तात्काळ अध्यादेश काढावा*या मागणीसाठी पाथरी येथे प्रकाश केदारे हे उपोषणाला बसले आहेत पाचव्या दिवशी हे उपोषण सुरू असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे हे उपोषण राज्य शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ सोडावे अशी मागणी माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अलोक चौधरी यांनी केले आहे
*उपोषणकर्ते – प्रकाश देव केदारे*
ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावे या मागणीसाठी गेल्या 16 डिसेंबर पासून प्रकाश देव केदारे हे पाथरी येथे अन्नत्याग उपोषणास बसले आहेत .
आज प्रकाश देवा केदारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘ठिय्या आंदोलन ‘ब्राह्मण समाजाच्या वतीने केले जाणार आहे . या आंदोलनात, महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आपल्या पाथरी शहरातील,सर्व समाज बांधव व माता भगिनींना विनंती आहे, मोठ्या संख्येने आज दिनांक 20-12-2023 रोजी सकाळी 11 वाजता उपोषण स्थळी उपस्थित राहायचे आहे .
: आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब यांनी ब्राह्मण समाजाला “परशुराम आर्थिक विकास महामंडळ” मिळावे या मागणी साठी पाथरी येथे होत असलेल्या अन्नत्याग उपोषणास भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला !
तसेच यावेळी आ. बाबाजानी साहेब यांनी, ज्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा मुद्दा सभागृहात मांडला त्या आमदार मनीषा कायंदे यांच्याशी दूरध्वनी संवाद साधून दिला व उपोषकर्ते प्रकाश केदारे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु उपोषणकर्ते प्रकाश केदारे हे,जोपर्यंत शासन परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा अध्यादेश काढत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही, या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत .
पाथरी वकील संघाने ब्राह्मण समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावे व त्यासाठी तात्काळ शासनाने जीआर काढण्यात यावा यासाठी अन्नत्याग उपोषण करत असलेले श्री.प्रकाश देव केदारे व समस्त ब्राह्मण समाजाच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला !
ब्राह्मण महिला आघाडी पाथरी च्या वतीने आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला व शासनाने त्वरित परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा जीआर काढावा अशी मागणी करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाने ब्राह्मण समाजाला आर्थिक विकास महामंडळ मंजूर व्हावे व शासनाने त्याचा तात्काळ जीआर काढावा या मागणीसाठी सुरू असलेल्या श्री.प्रकाश देव केदारे यांच्या अन्नत्याग उपोषणास जाहीर पाठिंबा दिला
फुलारवाडी चे सरपंच श्री.परमेश्वर नवले, श्री. खुडे, श्री. आष्टीकर यांनी ब्राह्मण समाजाच्या अन्नत्याग उपोषणास भेट देऊन आपला पाठिंबा दिला!
तेलंगणा ब्राह्मण संघटनेच्या वतीने आंदोलनात भेट देऊन पाठिंबा देण्यात आला
देव केदारे यांची प्रकृती अतिशय खालावत आहे, शासनाने त्यांच्या मागणीची दखल घ्यावी. प्रकाश देवक केदारे यांनी समाजाला भावनिक आवाहन केले आहे.
श्री. अनिल तळेकर यांनी ब्राह्मण समाजाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला व शासनाने परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा जीआर तात्काळ काढावा अशी मागणी केली !