नागपूर
विशेष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री दहा वाजता माजी आमदारांच्या समस्या आणि मागण्यासाठी विशेष हॉलमध्ये बैठक घेतली माजी आमदार संघटनेचा अध्यक्ष म्हणून आपण महाराष्ट्र राज्यातील अनेक माजी आमदारासह त्यांच्या समस्या आणि मागण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि अत्यंत सकारात्मक अशी चर्चा झाली अनेक मागण्या देखील मान्य झाल्याचे जेष्ठ नेते तथा संघटनेचे अध्यक्ष विजय गव्हाणे यांनी सांगितले आहे..
गेल्या काही अनेक वर्षांपासून माजी आमदारांच्या अनेक समस्या होत्या प्रलंबित प्रश्न होते या अनुषंगाने आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली रात्री दहा वाजता बैठक सुरू झाली ती एक वाजेपर्यंत चालली त्यामध्ये माजी आमदारांच्या पेन्शनचा विषय त्यांच्या पगाराचा विषय, औषधीचा खर्च मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था बैठक घेण्यासाठी कार्यालय,
त्यांच्या पत्नीच्या मेडिक्लेम चा विषय, अशा सर्व मागण्या मंजूर करण्यात आले आहेत
माजी आमदार संघटनेचे अनेक आमदार उपस्थित होते या आमदारांच्या मागण्या अत्यंत सकारात्मक रित्या पूर्ण झाल्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त केली आहेत असेही विजय गव्हाणे म्हणाले आहेत
आमदारांच्या या मागण्या सकारात्मक पद्धतीने पूर्ण झाल्यामुळे त्यांचे जीवन आणखी निश्चित सुरळीत सुरू राहील त्यांच्या आरोग्य विषयाच्या समस्या देखील सुटल्या आहेत त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा
Advertisements
Advertisements