परभणी : जिल्ह्यातील अंतीम मतदार यादी जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने पाच जानेवारी रोजी सुधारीत कार्यक्रम पाठवून २२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी रधुनाथ गावडे यांनी मंगळवारी (ता.२३) जाहीर केली. त्यामध्ये मृत, डबल नाव असलेले, फोटो असलेले एकूण ५१ हजार ७४२ मतदार वगळण्यात आले आहेत. तसेच नऊ हजार ९५१ नवीन युवा मतदारांची नोंद झाली आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला वेग आला आहे. निवडणुकीत मतदारयादी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानुषंगाने निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्याची अंतिम मतदार यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. नवीन मतदारांची नोंदणी, नाव काढणे, फोटो बदल, पत्ता बदल आदी कामे यामध्ये करण्यात आलेली आहेत. मतदार यादी अद्यावतीकरणासाठी घरोघरी सर्व्हेक्षणाची मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढल्याचे जिल्हाधिकारी गावडे यांनी सांगितले आहे.
तीन हजार १७१ मतदारांची वाढ
२७ ऑक्टोबर ते २३ जानेवारीपर्यंत अंतीम मतदार यादीमध्ये २८ हजार ३७० मतदारांची नाव नोंदणी झालेली आहे. तसेच २५ हजार १९९ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये तीन हजार १७१ मतदारांची वाढ झालेली आहे. एकूण मतदारांची संख्या १४ लाख ८२ हजार ३६५ इतकी झालेली आहे.
नऊ हजारावर युवकांची नोंदणी
पुनरीक्षण कार्यक्रमात १८ ते १९ वयोगटातील नऊ हजार ९५१ मतदारांची नव्याने नोंदणी झालेली आहे. तसेच २० ते २९ वयोगटात नऊ हजार ११९ मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारुप यादीत १८ ते १९ वयोगटाती मतदार संख्या आठ हजार ६२ होती ती जानेवारीच्या अंतीम मतदार यादीमध्ये १८ हजार ०१३ इतकी झालेली आहे.
दृष्टिक्षेपात
जिल्ह्यातील एकूण मतदार – १४,८२,३६५
गत लोकसभेवेळचे मतदार – १४७९१९४
वगळण्यात आलेले मतदार – ५१,७४२
युवा मतदारांची वाढ (१८ ते १९ वयोगट) – नऊ हजार ९५१
२० ते २९ वयोगटातील वाढ – नऊ हजार ११९
अशी वगळली नावे
- मृत व्यक्तींची नावे वगळली – २२ हजार ५७०
- ८० पेक्षा अधिव वय असलेले मृत्य व्यक्ती – सात हजार ३९९
- एकसारखी नावे असलेली – १६ हजार ४८८
- एकसारखे फोटो असलेले – चार हजार ४४५
- एकसारखी माहिती असलेले – ८४० मतदार
अशी आहे अंतिम मतदारांची आकडेवारी
मतदार संघ मागील आकडेवारी अंतीम आकडेवारी
जिंतूर ३७१०२२ ३७०३८८
परभणी २९२५६२१ ३२९२४३
गंगाखेड ४०६४४१ ४०६६०१
पाथरी ३७६११० ३७६१३३
एकूण १४७९१९४ १४८२३६५