Uncategorized

राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली राज्यपालांना काँग्रेसचे निवेदन

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात गुंडाराज सुरु आहे. लोकप्रतिनिधी, पत्रकारांवरल प्राणघातक हल्ले केले जात आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये घुसून गोळीबार करत आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे त्यामुळे हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन केली. या शिष्टमंडळात काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्तीअंबिरे ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड हे होते

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button