परभणी
हनुमंत चिटणीस
शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या आश्वासनानंतर पाथरी येथील परशुराम ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळासाठी सुरू केलेले उपोषण प्रकाश केदारे यांनी परत घेतले….
गेल्या पाच दिवसापासून केदारे उपोषणाला बसले होते .अनेक राजकीय नेते विविध संघटना आणि नागरिकांनी या उपोषणाला पाठिंबा दिला होता मात्र शिवसेनेचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान हे पाथरी पोहोचले आणि थेट केदारे यांच्याशी संपर्क केला त्यांच्या उपोषण श्री भेट दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण भेट घालून घेऊ या प्रश्नावर तोडगा निश्चित काढून असे आश्वासन दिल्यानंतर केदारे यांनी नारळाचे पाणी पीत उपोषण मागे घेतले
परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी अन्नत्याग उपोषणाला बसलेले प्रकाश देवा केदारे यांनी पाथरी येथे सुरु केलेल्या उपोषणास पाठींबा देवुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी बैठक करुन देतो असे आश्वासन यावेळी दिले. दिलेल्या आश्वासनानुसार उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
शिवसेना