नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या आणि राज्याच्या विकासात योगदान देता यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानतो, असं म्हटलं. मी जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देणार आहे. आगामी निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे. राजकारण हे सेवेचं माध्यम आहे. मी कुणावरही टीका करणार नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
मी पक्ष सोडल्यानंतर कोणावरही टीका करणार नाही. नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन देशात विकासाचं काम केलं आहे. त्यांच्या कामानं प्रभावित झालेलो आहे. विरोधी पक्षात असताना सरकारनं जे चांगलं काम केलेलं असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय संस्कृती राहिलेली, असं अशोक चव्हाण म्हणाले.