जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्था,मुकुंद आष्टीकर अध्यक्ष, नानासाहेब भेंडेकर उपाध्यक्ष
परभणी
दिनांक: 05 जानेवारी 2023 रोजी परभणी जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पथसंस्था मर्यादित परभणी हिंगोली जिल्हा कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या पथसंस्थेची सन 2022 2027 या कालावधीसाठी पुढीलप्रमाणे 11 संचालक माहे डिसेंबर 2022 मध्ये बिनविरोध निवडून आले होते. त्यांची आज सर्वसाधारण सभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालय परभणी श्री. गोविंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली दु.1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे संपन्न झाली.
या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते बिनविरोध पुढीलप्रमाणे अध्यक्ष, उपाध्याक्ष आणि सचिव
यांची निवड करण्यात आली.
1 श्री. मुकुंद रणनवरे आष्टीकर -अध्यक्ष
2 श्री. नानासाहेब दशरथराव भेंडेकर -उपाध्यक्ष
3 श्री. श्यामसुंदर सूर्यवंशी -सचिव
4 श्री कृष्णा देशमूख -संचालक
5 श्री. प्रशांत राखे -संचालक
6 श्री. देवेंद्रसिंह चंदेल -संचालक
7 श्रीमती. शिवकन्या चोपडे- संचालक
8 श्रीमती. शेख आसिया बेगम -संचालक
9 श्री. संदिप समिंद्रे -संचालक
10 श्री. शंकर राठोड -संचालक
11 श्री. रुपेश वाहूळे -संचालक