प्रेसनोट
मोबाईल दुकान फोडुन चोरी करणारी आंतर जिल्हा चोरटयाची टोळी उघड करुन मुक्या
आवळण्यात परभणी पोलीसांना यश
परभणी जिल्हा पोलीस दला तर्फे प्रेस नोट देण्यात येते की दिनांक. २२.१०.२०२२ ते दि.२३.१०.२०२२ रोजीचे रात्री नारायण चाळ परभणी येथील वर्ल्ड गिफ्ट मोबाईल शॉपी दुकान फोडुन आज्ञात चोरटयांनी आयफोन, नोकिया, वनपल्स, ओपो, रेलमी, सॅमसंग, व्हिवो, एअर पॉडस, अॅपल अॅडॉप्टर, टेक्नो अशा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल व ध्वनी उपकरण असा एकुण २०२ मोबाईल किंमती ४८,५१, ७३२/- रुपयाचा माल चोरुन नेल्यावरुन फिर्यादी राजेश ग्यानचंद चावला रा. नानलपेठ परभणी यांचे फिर्यादीवरून पो.स्टे नवामोंढा गुरनं. ४२८ / २०२२ कलम ४५७,३८० भादंवी प्रमाणे दि.२३.१०.२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयातील आरोपी अज्ञात असल्याने पोलीसानी घटनास्थळी भेट देवुन. परभणी शहरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपीचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस. अधिक्षक परभणी श्रीमती रागसुधा आर. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वसंत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे चार पथक तयार करून दि. २९/१०/२२ रोजी सायबर शाखा व सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी निसपन्न करून त्यातील दोन आरोपी हे मोठया सिताफीने ताब्यात घेवून त्यांचे हिश्याला आलेला मुददेमाल मोबाईल किंमती ९,८२,३११/- रुपयाचा हस्तगत केला होता.
दि.३०/१२/२०२२ रोजी मा. पोलीस अधिक्षक मॅडम परभणी यांचे आदेशाने अपर पोलीस अधिक्षक श्री. यशवंत काळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वसंत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक करुन यातील निसपंन्न आरोपी नामे अकबर खान हबीब खान रा अक्सा कॉलणी मालेगाव जि.नाशिक व कैसरखान हबीबखान वय २१ वर्षे रा पवारवाडी मालेगाव जि नाशिक याचा शोध घेणेकरीता मालेगाव जि नाशिक येथे जावुन माहीती काढत असतांना दि ३१/१२/२०२२ रोजी गोपनीय माहिती मिळाली की यातील आरोपी नामे कैसरखान हबीबखान रा पवारवाडी मालेगाव जि नाशिक हा त्याचे राहते घरी आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याच्या घराच्या बाजूस सापळा रचून अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेतले व त्याचे हिश्याला आलेला सदर गुन्हयातील मुद्देमाल ४२ मोबाईल किंमती ८,२९,३८५/- रुपयाचा मुद्देमाल व पोस्टे शिवाजी नगर जि. लातूर गु.र.न. ३७१/ २०२२ कलम ४५४, ४५७,३८० भा द वि मधील मुद्देमाल ४ एलइडी, १ ओहन व १ साउंड किमंती ७,२८,८७०/-रुपायाचा मुद्देमाल असा जप्त केला. त्यास अधिक विचारपूस करुन अधिक गुन्हया बाबत विचारले असता त्यांने त्याचे साथीदारसह खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे.
अ.क्र.
पो स्टे चे नाव
गु.र.न.
जप्त
केलेला आजपावेतो
मुद्देमाल
१.
पो.स्टे नवामोंढा परभणी
गुरनं. ४२८ / २०२२ क ४५७,३८० भा.दं.वी.
१८,११,६९६/-
शिवाजी नगर जि. लातुर
गुरनं. ३७१/ २०२२ कलम ४५४, ४५७, ३८० भा.दं.वि.
७,२८,८७०/-
एकुण
२७,१२,१२४/-
पो.स्टे नवामोंढा परभणी गुरनं. ४२८/२०२२ क ४५७,३८० भा. दं.वी. गुन्हयातील किमती १८,११,६९६/- रुपयेचा मुद्देमाल च शिवाजी नगर जि. लातूर गुरनं. ३७१/ २०२२ कलम ४५४,४५७,३८० भा. दं. वि. गुन्हयातील ७,२८,८७०/- रूपयेचा मुद्देमाल असा एकुण २५,४०,५६६/- रुपयाचा मुद्देमाल व सदर गुन्हयात यापूर्वी दोन व आज रोजी एक असे तिन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक मॅडम परभणी यांचे आदेशाने अपर पोलीस अधिक्षक श्री. यशवंत काळे उप.वि. पोलीस अधिकारी सिरतोडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि / साईनाथ पुयड, पोउपनि / मारोती चव्हाण, पोउपनि / नागनाथ तुकडे, पोउपनि / व्यंकटी कुसमे, पोह/ बालासाहेब तुपसुंदरे, पोह/ रविकुमार जाधव, पोह / राहुल परसोडे, पोह/सयद मोबीन, पोना / दिलावर खान, पोना/ हरिचंद्र खुपसे पोना / सिध्देश्वर चाटे, पोना / विलास सातपुते, चापोना / संजय घुगे, चापोशि