संत साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ
परभणी, 11 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ शुक्रवारी (दि.03) विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आला.
यावेळी माजी आमदार अँड.विजय गव्हाणे,परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे,सौ. रेखाताई गुट्टे, हभप बालासाहेब मोहिते, हभप माऊली महाराज दाभाडे यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थितीत होते.
वारकरी संप्रदायाचे पाईक स्व.अॅड. शेषरावजी धोंडजी भरोसे (आबा) यांच्या संत तुकाराम महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या भुमीवर यापूर्वी अनेक धार्मिक कार्यक्रम झाले आहेत. त्यामध्ये 9033 ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळा तसेच अनेक संत-महतांचे किर्तन, प्रवचने आणि धर्मजागरण कार्यक्रम झाले आहेत. यावर्षी येथे दि.12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान 11 वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन संपन्न होणार आहे.