*जालना जिल्ह्यात बौद्ध धम्म पदयात्रेचे भव्य आणि जल्लोषात स्वागत होणार..!*
=परभणी
विशेष
17 जानेवारी 2023 ते 15 फेब्रुवारी 2023 कालावधीत परभणी ते चैत्यभूमी दादर, मुंबई पर्यंत भव्य बौद्ध धम्म पदयात्रा निघणार आहे. पदयात्रेचे नियोजन करण्यासाठी आज सिध्दार्थ हत्तीअंबिरे प्रमुख उपस्थितीत जालना जिल्ह्यातील बौद्ध उपासकांची महत्त्वाची बैठक येथील आनंद बौद्ध विहारात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जालना जिल्ह्यातील बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एक दिलाने सांगितले की जेव्हा ही ऐतिहासिक धम्म पदयात्रा जालना जिल्ह्यात प्रवेश करील त्यावेळेस अत्यंत भव्य व जल्लोषात स्वागत करण्यात येईल. येथील उपासकांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बौद्ध धम्म पद यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.याप्रसंगी भंते कश्यप, बाळासाहेब अंभीरे, नितीन पगारे, सिद्धार्थ इंगळे, दिनकर घेवंदे ,दिलीप खरात आदी मान्यवर उपस्थित होते.